Ashok Chavan Resign: अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची प्रत माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय म्हटले?
Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोच चव्हाणांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनामा कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोच चव्हाणांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनामा कॉपी (Resignation Copy Of Primary Membership of the Indian National Congress Party) एबीपी माझाच्या हाती लागली आहे. पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या कॉपीमध्ये विधानसभा सदस्याचा पुढे माजी हा शब्द लिहण्यात आलेला आहे. या वरून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा झाल्यचे स्पष्ट झाले आहे. हा राजीनामा त्यांना काँग्रसे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे. आता अशोक चव्हणांची पुढील राजकीय दिशा काय असणार यकडे सर्वांचे लक्ष लगले आहे.
अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी आमदरकीचा ही राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याचीही माहिती आहे. 14 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशोच चव्हाण यांच्यासोबत काही आमदार देखील जाण्याची शक्यता आहे. आज केवळ अशोक चव्हाण यांनीच राजीनामा दिला आहे, अशी माहिती विधीमंडळ सूत्रांनी दिली आहे. 11 वाजून 24 मिनिटांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तो अध्यक्षांनी स्वीकारला आहे.
राजीनाम्यात नेमकं काय म्हटलय? (What is In Resignation Letter)
मी 12 फेब्रुवारी 2024 मध्यान्हनंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे.
आपला विश्वासू,
अशोकराव शंकरराव चव्हाण
राज्यसभा दिली जाण्याची दाट शक्यता
अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मंत्रीपद देण्यासाठी भाजप नेत्यांकडून विरोध होत आहे त्यामुळे त्यांना राज्यसभा दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
नाना पटोले आज दिल्लीला जाणार
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्यानंतर अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीला जाणार आहे. अशोक चव्हाण यांच्या संदर्भात सुरू असलेल्या घडामोडी संदर्भात दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. नाना पटोले रायपुरहून दिल्लीला जाणार आहेत.
अशोक चव्हाण नॉट रिचेबल
वर्षभरापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. स्वतः चव्हाण यांनी याचे अनेकदा खंडण केले..मात्र, आज आपल्या सर्व सचिवांसह अशोक चव्हाण नॉट रिचेबल आहेत. भाजपच्या एका बैठकीत बावनकुळे यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे जाहीर भाषणात सांगितले होते. भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाविषयी जाहीर वक्तव्य केले होते.. अशोक चव्हाण हे संस्थापक असलेल्या व त्यांच्या गटाची सत्ता असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या 147 कोटी रुपयांच्या कर्जाला शासनाने थकहमी दिली होती.
हे ही वाचा :