एक्स्प्लोर

Raj Thackeray-Uddhav Thackeray: रश्मी ठाकरेंकडून राज ठाकरेंचं स्वागत; नागपूरात मंत्रिमंडळ विस्तार सुरु असताना मुंबईत काय घडलं?

Raj Thackeray-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंनी लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कौटुंबिक कार्यक्रमात ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये काल एकत्र आले होते. राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी लावली.

रश्मी ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरेंचं स्वागत केलं-

रश्मी ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरेंचं स्वागत केलं. मात्र उद्धव आणि राज ठाकरे यांची थेट भेट थोडक्यात हुकली. उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंनी लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. काल नागपूरात मंत्रिमंडळाचा विस्तार असताना मुंबईत ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. राज ठाकरे आणि उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दरम्यान राज  ठाकरे यांनी पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता पुणे शहरातील पक्ष कार्यालयात भेट देणार आहेत. पक्ष कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे भेट घेणार आहेत. 

महापालिकेच्या निवडणुकीत मनसे महायुतीमध्ये सामील होणार?

आपण भाजपासोबत राहायला पाहिजे, भाजपाला आपण मदत केली आहे. महायुतीला लोकसभेत मदत केली आहे. निकाल आत्ता आपल्या बाजूने आला नाहीये. पण त्यांच्यासोबत राहून आपला पुढचा प्रवास केला पाहिजे असं मत बैठकीमध्ये आलेल्या नेत्यांचं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्याचा विचार आहे, हे स्पष्ट केल्यानंतर, दोघांच्या विचारधारा एकच आहेत. त्यात विचारधारेचे पक्ष एकत्र आले तर, आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो. देवेंद्र फडणवीस यांचा वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वजण सकारात्मक असल्याच्या चर्चा आहेत. राज ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे, जर या दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झाली तर ते सोबत पुढे जातील अशी शक्यता अनेक जण वर्तवत आहेत. 

राज ठाकरे-उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?

नाराज भुजबळ नाशिकला परतले, मुनगंटीवार अनुपस्थित, तानाजी सावंत बॅग घेऊन पुण्यात; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकं काय काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget