Election Commission on BJP : निवडणूक आयोगाचा भाजपला दणका, अकोल्यात भाजपला माघार घ्यायची वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?
Election Commission on BJP, Akola : अकोला लोकसभा मतदारसंघातून 3 एप्रिल रोजी भाजप नेते अनुप धोत्रे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Election Commission on BJP, Akola : अकोला लोकसभा मतदारसंघातून 3 एप्रिल रोजी भाजप नेते अनुप धोत्रे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे अकोला जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध भाजपकडून एक स्टेज उभारण्यात येत होता. जेणेकरून या स्टेजवर भाजपच्या नेत्यांना उभं राहता येईल. आता या स्टेजवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. वंचितने थेट निवडणूक आयोगालाच इशारा दिला. भाजपाला स्टेज उभारू दिल्यास आम्हीही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी सभा घेऊ, असा इशारा वंचितने निवडणूक आयोगाला (Election Commission ) दिला. त्यानंतर निवडणूक आयोगाने भाजपला स्टेज काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय होतंय प्रकरण?
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय रस्तावर रस्ता अडवून भाजपच्या वतीने स्टेज उभाण्यात येत होता. अकोल्यात भाजप उमेदवाराच्या नामकांनसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डझनभर भाजप नेत्यांसाठी हा रस्त्यावर स्टेज उभारला जात होता. आचारसंहिता केवळ इतर पक्षा साठी आहे का? असा सवाल वंचितकडून प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केला. तसेच सिव्हिजील ॲपवर या संदर्भात तक्रार दाखल केली. लागलीचं निवडणूक आयोगाने स्टेज काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय. स्टेजच्या मुद्द्यावरुन भाजपला माघार घेण्याची वेळ आली आहे.
वाहतूक कोंडी होणार नाही, याचा विचार केला जाईल, रणधीर सावरकर
निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 3 तारखेला भाजप उमेदवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डझनभर महायुतींच्या नेत्यांसाठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारला जात होता. यापूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाचे साठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारण्याची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती. सत्ताधारी भाजपसाठी नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले स्टेजबाबत वंचितन तक्रार दाखल केली. भाजपला जर स्टेज उभारू दिला तर 'आम्ही पहिली सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन भवनात घेवू आणि कुठलीही परवानगी घेणार नाही, असा इशारा देताच निवडणुक आयोगाने तातडीने स्टेज काढून टाकण्याची कार्यवाही केली. आम्ही स्टेज उभारलं होतं, पोलिसांनी विनंती केली, त्यानंतर आम्ही हे स्टेज काढलं आहे. वाहतुकीची कोणतीही कोंडी होणार नाही याचा विचारही केला जाणार असल्याचं मत भाजपचे आमदार रणधीर सावरकरांनी व्यक्त केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या