एक्स्प्लोर

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना माफ करा, सडका मेंदू साफ करा, शिंदेंचे शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर, नेमकं प्रकरण काय?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना शेवटच्या रांगेत बसवल्याने शिवसेना शिंदे गटाकडून डिवचण्यात येत आहे.

Uddhav Thackeray India Alliance Meeting: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल (7 ऑगस्ट) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीधील घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं. यादरम्यानचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवल्याने शिवसेना शिंदे गटाकडून डिवचण्यात येत आहे. यासाठी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार, नेते आणि प्रवक्ते छत्रपती शिवाजीपार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पोहचले. 

दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सर्वांत शेवटच्या रांगेत बसवून काँग्रेसने अवमानजनक वागणूक दिली. काँग्रेससोबत जाऊन स्वत:चे अवहेलना उद्धव ठाकरे करुन घेत आहे, म्हणून स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून क्षमा करावी, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात येत आहे. यावेळी आमदार मनीषा कायंदे, प्रवक्ते शितल म्हात्रे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे इतर पदाधिकारी होते. यादरम्यान, उद्धव ठाकरेंना माफ करा, सडका मेंदू साफ करा, असं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ शिंदेंचे शिवसैनिक बोलताना दिसले. 

नरेश म्हस्के काय म्हणाले?

बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का?काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे. तुमच्यापेक्षा एक-एक खासदारवाले पक्ष बरे... त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं... महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 

उद्धव ठाकरे मागच्या रांगेत, संजय राऊत काय म्हणाले?

मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते. उद्धवजींना पुढे बसवले होते. पण, त्यांचे म्हणणे पडले की स्क्रीनच्या समोर बसून पाहताना त्रास होतो किंवा नीट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सर्वच पाठीमागे गेलो, असं संजय राऊतांनी सांगितले. हे भाजपचे आयटी सेलवाले फालतू लोक आहेत. त्यांना समजायला हवे. उद्धव ठाकरेंचे अजून पण फोटो आहेत, ते तुम्ही पाहिले नाहीत का? उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे यांना राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांचा नवीन घर संपूर्ण दाखवलं. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू होते. मी स्वतः तिथे होतो. कमल हसन होते. शरद पवार देखील आमच्या सोबत बसले होते. प्रमुख नेत्यांना पुढे बसवले होते. पण, उद्धव ठाकरे म्हणाले इथून दिसणार नाही. त्यामुळे ते मागे आले होते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

संबंधित बातमी:

Sanjay Raut : इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवलं, टीका करणाऱ्यांवर संजय राऊत तुटून पडले, नरेश म्हस्केंना 'दुतोंडी गांडूळ' म्हणत डिवचलं

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईतील महसूल विभागाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Ashok Saraf: अशोक सराफांच्या उपस्थितीत अंबरनाथमध्ये नाट्यगृहाचं लोकार्पण
Black Diwali : बेरोजगार तरुणांची काळी दिवाळी, ठाण्यात आंदोलन
Mira Road Accident: मीरा रोडमध्ये भीषण अपघात, चिमुकलीचा जागीच मृत्यू
Panvel Water Crisis: पाणीटंचाईमुळे पनवेलमध्ये नवीन बांधकामांवर बंदी घालण्याची मागणी
Worli Fire: वरळीतील महाकाली नगरमध्ये भीषण आग, झोपडपट्टीला आग, सिलेंडरचा स्फोट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईतील महसूल विभागाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
FPI: दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, तीन महिन्यानंतर शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, 3 महिन्यानंतर शेअर बाजारात कोट्यवधी गुंतवले
Embed widget