Prithviraj Chavan on Eknath Shinde : शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतलीय, एकनाथ शिंदेंना वेळ देऊया : पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवरायांच्या पायावर हात लावून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शपथ घेतली आहे, त्यांना वेळ देऊया. मला आशा आहे ते निर्णय घेतील, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवरायांच्या पायावर हात लावून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शपथ घेतली आहे, त्यांना वेळ देऊया. मला आशा आहे ते निर्णय घेतील. सर्वात आधी मी मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) विषय हाती घेतला होता. आमच्या सरकारने मराठा आरक्षण दिलं होतं.आम्ही कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आरक्षण दिलं होतं. जातनिहाय जनगणना करायला हवी ही काँग्रेसची (Congress) भूमिका आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरही भाष्य केलं. "कामकाज सल्लागार समितीने अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 7 तारखेपासून अधिवेशन सुरु होईल जनतेचे प्रश्न चर्चिले जातील. नागपूर परिसरात पाऊस झाला. हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यावर उपाययोजना कराव्या अशी विनंती केली आहे", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
जातीय जनगणना करा
जातीय जनगणना करा ही आमची ही मागणी आहे. फक्त जातीय जणगणना नाही ही इकॉनॉमिक सेन्सेसवर असेल म्हणजे आर्थिक आणि सामाजिक गोष्टींवर निर्भर असेल. आमचं सरकार पडलं गेलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं हेच माझं विधान होतं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
सुनील तटकरेंवर हल्लाबोल (Prithviraj Chavan on Sunil Tatkare)
दरम्यान, सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. तटकरेंचा बालीशपणा आहे. मला कुठलीही सुपारी वगैरे नव्हती. तेवढीच कामं नसतात, असं चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीने सरकार पाडलं नसते तर मराठा आरक्षण टिकवलं असतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यावर सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीला संपवण्यासाठी दिल्लीतून सुपारी घेऊन आले होते, अशी टीका केली होती.
Prithviraj Chavan on CM Eknath Shinde VIDEO : पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद