VIDEO : भर भाषणात मंच सोडून शिवरायांची शपथ, मराठ्यांना आरक्षण देणारच; एकनाथ शिंदेंचा निर्धार
Eknath Shinde On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई: मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलं. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असं सांगत त्यांनी राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली.
मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाच्याही वाट्याचं काढून घेणार नाही, मराठा समाजाला न्याय देणार असं सांगत एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि शपथ घेतली.
मराठा समाजाला आरक्षण देताना सर्वच समाज घटकाला न्याय कसं मिळेल हे पाहिलं जाईल, मराठा समाजाला निश्चितच आरक्षण दिलं जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवरायांच्या पुतळ्यासमोर झुकून शब्द दिला
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाता मुद्दा तापल्याचं दिसून येतंय. जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत आज संपली आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या दसऱ्या मेळव्याच्या स्टेजवरूनच एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनी भाषण सुरू असतानाच शिवरायांच्या पुतळ्यासमोर गेले आणि त्या ठिकाणी नतमस्तक झाले. एकनाथ शिंदेंनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण देणार असा शब्द दिला.
हिंमत केली, सरकार आडवं कलं आणि इकडे आलो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठ्या खाल्ल्या ते सांगा. तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती. बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यानी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. हिंमत करून, सरकार आडवं करून मी तिकडून इकडे बसलोय. तुमच्यातील एक जण उद्या मुख्यमंत्री झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तमाम जनता माझ्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत मला पदाची कसलीही लालसा नाही. मी दावोसमध्ये जातो आणि मुंबईच्या नाल्यामध्ये उतरतो, गरीबांच्या वसतीमधील शौचालयाची पाहणीदेखील करतोय.
VIDEO : भाषण थांबवलं.. शिवरायांसमोर नतमस्तक, अन् म्हणाले Maratha Reservation देणारच