एक्स्प्लोर

महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

लोकसभा निवडणुकीपेक्षा 25 लाख मतं आपल्याला मिळाली की आपण 200 जागा जिंकू एवढं पोटेंशियल आणि ताकद आपल्याकडे आहे. महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच राज्य सरकारचं विधानसभा निवडणुकांपूर्वीचं शेवटचं अधिवेशन पार पडलं. त्यानंतर, आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे भरवण्यात आला होता. या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना केल्या. एकसाथ, कदम मिलाकर चलना होना.. असे म्हणत महायुतीमधील (mahayuti) तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना कानिपचक्या दिल्या. यावेळी, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत, फेक नेरेटीव्ह पसरवणाऱ्यांच्या ट्रॅकमध्ये आपण अडकायचं नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली.  

लोकसभा निवडणुकीपेक्षा 25 लाख मतं आपल्याला मिळाली की आपण 200 जागा जिंकू एवढं पोटेंशियल आणि ताकद आपल्याकडे आहे. महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे. आपल्याला लक्षात आलंय, ते दररोज खोटं बोलत होते, पण आपण गाफिल राहिलो. आपली लढाई फेक नेरेटीव्ह या चौथ्या पक्षासोबत होती, खोट बोल पण रेटून बोल या त्यांच्या पद्धतीचा परिणाम झाला आणि आपला पराभव झाला. सत्य चिरकाल असतं, असत्याला फार काळ नसतो. असत्यावर एक निवडणूक जिंकता येते, पण सातत्याने खोटं चालत नसतं. हे घरी नवरा-बायकोला तरी खरं बोलतात की नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. 

लाडक्या बहि‍णींना मोलाचा सल्ला

गावोगावी ह्यांचेच लोकं फॉर्म घेऊन उभे आहेत, असे म्हणत विरोधकांच्या हुशारीवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला. या योजनेत आता कुठल्याही अटी-शर्ती नाहीत. तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तरीही तुम्हाला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ, हमी पत्र लिहून तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ अर्ज भरताना लाडक्या बहि‍णींनी एक गोष्ट काळजीपूर्वक लिहिली पाहिजे, ती म्हणजे बँक खात्याचा नंबर, बँक खात्याचा नंबर चुकला तर पैसे बँक खात्यात येणार नाहीत. त्यामुळे, सर्वच महिला भगिनींनी योजनेचा लाभ घ्यावा, कारण आम्ही ही योजना महिलांना बाहेरा टाकण्यासाठी नाही तर योजनेत घेण्यासाठीच राबवत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. 

महिला भगिनींसाठी अनेक निर्णय

आपण महिला भगिनींसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांना एसटीमध्ये सवलत दिली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांना मोफत गॅस वाटत करणार आहोत. तसेच, राज्यातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे. त्यामुळे, पदवी व पदविका शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थींनींना मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे. सर्वच जाती-धर्माच्या मुलींना या माध्यमातून मोफत शिक्षण मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, घरात जन्म घेणाऱ्या मुलींसाठीही आपण योजना आणली. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत मुलीच्या नावे 1 लाख रुपये मिळणार आहेत, हेही त्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांसाठीही योजना 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये, केवळ 1 रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. देशात सर्वाधिक पीक विमा आपल्या महाराष्ट्राने दिला आहे. याशिवाय वीज बिल माफीचा निर्णय, मागेल त्याला सौरपंपही देण्यात येत आहे. आपल्याच सरकारने दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, असेही फडणवीसांनी म्हटले. 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल

महाराष्ट्र सरकारने सिंचन क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. महाराष्ट्र दुष्काळ अवर्षणमुक्त होईल, असेही फडणवीसांनी म्हटले.

महायुतीच्या प्रवक्त्यांना सुनावलं

आज आपलाच एकमेकांत विसंवाद दिसतो, आज आपलेच प्रवक्ते एकमेकांवर बोलत असतात. जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल त्याने आपआपल्या नेत्यांना अगोदर विचारावे. त्यांच्या नेत्यांनी होकार दिला तर आपली खुमखुमी पूर्ण करावी, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता अमोल मिटकरींना टोला लगावला. यावेळी, अटलबिहारी वाजपेयी यांची कविता ऐकवली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 26 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Live Joins The Volkswagen Experience AdventureDahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडेPune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Embed widget