(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा निवडणूक का लढणार नाही? रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार का? सगळ्या प्रश्नांचा एकनाथ खडसेंनी कंडका पाडला
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या आजारपणाचे कारण लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला.
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या आजारपणाचे कारण लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. तर रोहिनी खडसे यांनी विधानसभेची तयारी करत असल्याचे म्हणत निवडणूक लढण्यापासून फारकत घेतली. दरम्यान, एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी टीका केली होती. सतीश पाटील यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली.
काही महिन्यापूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता
एकनाथ खडसे म्हणाले, डॉ. सतीश पाटील यांनी केलेली टीका ही अपूर्ण माहितीच्या आधारावर केली आहे. गेल्या काही महिन्यात मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला निवडणुकीचा ताण तणाव सहन होणार नसल्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याची, त्याच बरोबर रोहिणी खडसे या विधानसभेचे तयारी करत असल्याची माहिती मी आमचे नेते शरद पवार यांना दिली आहे.
मी लढणारा नेता आहे आणि नेहमी लढत राहणार
आपण वेळेवर मागे हटत आहोत असे म्हणणे उचित होणार नाही. मी लढणारा नेता आहे आणि नेहमी लढत राहणार आहे. पक्षाचा उमेदवार विजयी होण्यासाठी मी सर्व तो परी प्रयत्न करणार आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मी उभे राहावे किंवा उभे राहू नये हे? याबाबत माझा पक्ष मला सांगेल हे सांगणारे कोण? असा सवालही एकनाथ खडसे यांनी केलाय. संजय पवार किरकोळ माणूस आहे त्यावर उत्तर देण्याइतका तो मोठा नाही. माझा राजीनामा यांनी मागू नये,यांनी शरद पवार यांच्या सोबत गद्दार केली आहे,आपल्या भरवश्यावर तो जिल्हा बँकेत निवडून आला आहे.
रक्षा खडसे यांच्याविरोधात प्रचार करणार?
पुढील दोन दिवसात सक्षम उमेदवार रावेर मतदार संघात दिला जाईल. पक्षाच्या आदेशप्रमाणे काम करू,पक्षासाठी काम करू. सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार ज्या प्रमाणे बारामतीत एकमेकांविरोधात प्रचार करत आहेत. त्याच पद्धतीने आपण रक्षा ताई यांच्या विरोधात देखील प्रचार करणार आहोत. ही निवडणूक आपल्याला धर्म संकट वाटत नाही,पक्ष जो आदेश देईल त्या नुसार आपण काम करणार,मला पक्षाने जाब विचारावा ,इतरांनी विचारू नये.
इतर महत्वाच्या बातम्या