एक्स्प्लोर

ईडीने मला जेलमध्ये टाकले तरी माझ्या जागी माझं कुटुंब येथून लढेल, कर्जतमध्ये रोहित पवारांचा एल्गार

Rohit Pawar : दबाव टाकून सर्वच खासदार जर भाजपने स्वतःच्या बाजूने केले, तर भविष्यात निवडणूका होतील की नाही याची शंका आहे.

Rohit Pawar : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला असून, याच मेळाव्यात बोलतांना रोहित पवारांनी (Rohit Pawar) सूचक वक्तव्य केले आहे. 'ईडीने मला जेलमध्ये टाकले तरी माझ्या जागी माझं कुटुंब येथून लढेल', असे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरु असून, याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

मंगळवारी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आलेल्या निर्णयानंतर शरद पवार गटाचा पहिला मेळावा आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान याच मेळाव्यात बोलतांना रोहित पवार म्हणाले की, “काल घेतलेला निर्णय संविधानाच्या बाजूने नव्हता. गेल्या काही वर्षांत संविधान बाजूला ठेवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. 2014 ते आतापर्यंत संविधानाला तडा आणण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. दबाव टाकून सर्वच खासदार जर भाजपने स्वतःच्या बाजूने केले, तर भविष्यात निवडणूका होतील की नाही याची शंका आहे. 2024 मध्ये भाजपची सत्ता आली तर पुढच्या निवडणूका लागतील याबाबत देखील शंका आहे. भाजपसोबत गेलेल्या नेत्यांना लोकसभेनंतर स्वतःच्या चिन्हावर नाही, तर भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल. तसेच जयंत पाटलांवर ईडीचा दबाव टाकला जातोय, पण ते लढत असल्याचे", देखील रोहित पवार म्हणाले. 

घड्याळ आपल्याकडे नसलं तरी वेळ आपलीच

पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, " निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा एक सेल झाला आहे. शरद पवार गटाचे नाव आज संध्याकाळी कळेल, चिन्ह आज मिळेल की नाही माहिती नाही. पण जे चिन्ह मिळेल ते सर्वसमान्यांच्या मनातील चिन्ह असेल. घड्याळ आपल्याकडे नसलं तरी वेळ आपलीच आहे. तसेच, नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करताना राष्ट्रवादीचा पंचा देता येणार नाही", असेही रोहित पवार म्हणाले. 

येत्या काळात राज्यभर दौरा केला जाणार

भाजपकडे पक्ष फोडण्याची ताकद असेल, तर धनगर, लिंगायत आणि इतर समाजाला 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देण्याची धमक त्यांच्याकडे नाही का?, शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक, गुजरातमध्ये जात असलेल्या उद्योगांना थांबवण्याची धमक या भाजपमध्ये नाही का? , असे म्हणत रोहित पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.  तर, येत्या काळात पक्ष मजबूतीसाठी राज्यभर दौरा केला जाणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Rohit Pawar : पक्ष, चिन्ह कोणालाही मिळू दे पण ज्या बापाने ती पार्टी सुरु केली असा बापमाणूस आमच्याबरोबर : रोहित पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Full PC : Raj Thackeray यांचा वरळीत कार्यक्रम, आदित्य ठाकरे म्हणतात...Bala Nandgaonkar MNS Worli Speech : वरळीकरांनो साहेबांच्या हाकेला ओ द्या ! नांदगावकरांचं जाहीर आवाहनRaj Thackeray Full Speech Worli : कोळी,वरळीकर आणि प्ररप्रांतीय; राज ठाकरे यांचं धडाकेबाज भाषणSandeep Deshpande Worli Speech:वरळीसाठी स्पेशल DCR असायला हवा; राज ठाकरेंसमोर देशपांडे स्पष्टच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
Embed widget