एक्स्प्लोर

अजितदादांच्या उमेदवाराला लीड देण्यासाठी फडणवीसांच्या आमदारांमध्ये पैज, ओमराजेंविरोधात दोघांनी दंड थोपटले

Dharashiv Loksbha : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांना उमेदवारी दिली आहे.

Dharashiv Loksbha : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, अर्चना पाटील यांना कोण जास्त लीड मिळवून देणार? यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दोन विश्वासू आमदारांमध्ये शर्यत लागली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर औसाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. 

काय म्हणाले अभिमन्यू पवार ?

राजा राऊत (Rajendra Raut) आणि माझी शर्यत लागलेली आहे. अर्चना पाटील (Archana Patil) यांना सर्वांत जास्त लीड कोण देणार? औसेकर देणार की, बार्शीकर देणार ? असा सवाल सभेला उपस्थित नागरिकांना करत अभिमन्यू पवार यांनी पैजेबाबत भाष्य केलं आहे. शिवाय औसामधूनच अर्चना पाटील यांना सर्वाधिक लीड मिळेल, असा दावा अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी केला आहे. 

आजच्या सभेची गर्दी पाहून विरोधकांना धडकी भरली

पुढे बोलताना पवार म्हणाले, आजच्या सभेची गर्दी पाहून विरोधकांना धडकी भरली असेल. आज धडाकेबाज पद्धतीने फॉर्म भरलेला आहे. समोरच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त होण्याचेच फक्त बाकी आहे. आपण नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत, असंही अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी स्पष्ट केलं. यावेळी पवार यांनी अबकी बार 400 पारच्या घोषणाही दिल्या.

400 वा आकडा आपला असणार 

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 399 जागांचा फैसला केलेला आहे. 400 वा आकडा आपला असणार आहे. जागा निवडून आणणार की नाही? 400 वा आकडा आपला होणार की नाही? माझी आणि राजाभाऊ यांची शर्यत लागली आहे. औसेकर देणार की बार्शीकर देणार, असंही अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी सांगितले. त्यामुळे औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि राजेंद्र राऊत यांनी ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. दोघांनीही अर्चना पाटील यांना सर्वांत जास्त लीड देण्याचा चंग बांधलाय. धाराशिव लोकसभेत पारंपारिक प्रतिस्पर्धी असेलेले पाटील -निंबाळकर घराणे आमने सामने आले आहे. त्यामुळे धाराशिवच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Latur Rain : लातुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वीज पडून दोन व्यक्तींसह 13 जनावरांचा मृत्यू, शेतपिकांचंही कोट्यवधींचं नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget