एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : "देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! असं उत्तर फडणवीस यांनी दिलं आहे.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिलं. "देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप चॅट बाहेर आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी भाजपने विरोधकांची पाटण्यातील बैठकीवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "मी पाटण्याला गेलो होतो, पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सॅप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. हा माझा परिवार आहे. सूरज, शिवसैनिक आणि हा महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कुणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहित. पण मी माझं कुटुंब जपणार. त्यामुळे परिवार बचाओ बोलू नका." 

उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस लिहितात की, "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका. 

चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा

➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर...
➡️ मुंबईला कुणी लुटले यावर...
➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर...
➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर...
➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर...
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)

तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या...
बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…"

 

हेही वाचा

देवेंद्रजी, परिवार तुम्हाला सुद्धा आहे, आम्ही बोललो तर... देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेला उद्धव ठाकरे यांचं उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
IPO Update : MobiKwik चा आयपीओ लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, 85 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदारांची दिवाळी
पहिल्यांदा आयपीओ थांबवला, योग्य वेळी लाँच केला, मोबिक्विचा IPO लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC :  भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेतRam Shinde News : विधानपरिषद सभापती पदी राम शिंदे यांची निवड निश्चित, निलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले?Sudhir Mungantiwar Nagpur : सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर? माध्यमांशी चर्चा करताना काय म्हणाले?Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
IPO Update : MobiKwik चा आयपीओ लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, 85 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदारांची दिवाळी
पहिल्यांदा आयपीओ थांबवला, योग्य वेळी लाँच केला, मोबिक्विचा IPO लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Santosh Deshmukh Beed Death: मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Embed widget