Devendra Fadnavis on Sanjay Raut : जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात, त्यांच्यावर बोलणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Devendra Fadnavis on Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांना जोरदार टीका केली आहे.
Devendra Fadnavis on Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांना जोरदार टीका केली आहे. "संजय राऊत यांच्याबद्दल मला प्रश्न विचारत जाऊ नका. जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात, मला वाटत त्यांच्यावर मी बोलू नये. सध्या ते लंडनमध्ये आहेत, तेथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी योग्य ते औषध घ्यावे", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकसभेच्या 5 व्या टप्प्यापर्यंत आम्ही बहुमत पार केलेले आहे. आम्हाला अभूतपुर्व यश मिळणार आहे. मोदीजी प्रधानमंत्री होणार आहेत. आता शपथविधी कधी होईल, हे मी सांगू शकत नाही. पण निश्चितपणे मोदीजीच देशाचे पंतप्रधान होणार आहेत, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जागा वाटपाबाबत आमची चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय होईल. महायुती योग्य प्रकारे निवडणूक लढवेल. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील. योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील. निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत, त्यांचा सन्मान राखला जाईल.
पोलीसांनी योग्य प्रकारे चौकशी केली, सीडीआर वगैरे काढले
पुण्यातील अपघात अतिशय गंभीर आहे. पोलीसांनी योग्य प्रकारे चौकशी केली, सीडीआर वगैरे काढले. त्यामुळेच लक्षात आले की, यामच्यामध्ये गडबड आहे. म्हणून त्याचे धागेदोरे मुळापर्यंत गेल्यानंतर लक्षात आलं. रक्ताचे नमुने रिल्पेस करुन घेण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला. यामध्ये ज्या डॉक्टरांचा सहभाग होता, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे, असंही फडणवीस यांनी सांगितले.
दोन्ही समाज वर्षानुवर्षे सोबत राहिलेले आहेत
बीडमध्ये जातीय तेढ वाढणार नाही. दोन्ही समाज वर्षानुवर्षे सोबत राहिलेले आहेत. मात्र, काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा प्रकरचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. दोन्ही समाजातील जाणते लोक असे प्रयत्न करत असले, तर त्यांनी असे प्रयत्न थांबवले पाहिजेत, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.
इतर महत्वाच्या बातम्या