एक्स्प्लोर

गोलमाल है भाई, सब गोलमाल है! भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळेच पुणे अपघात प्रकरणातील SIT च्या अध्यक्ष

Pune Sassoon SIT Enquiry : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील गैरप्रकारासंबंधित चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुणे : पोर्शे अपघात प्रकरणात (Pune Porsche Accident) ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आरोपीचे नमुने बदलून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोन जणांना चिरडलं. यानंतर अल्पवयीन आरोपीच्या वडीलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे पुरवले. या प्रकरणात ससून रुग्णालयातील गैरप्रकारासंबंधित चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील SIT समितीच्या अध्यक्षावरच भ्रष्टाचाराचा आरोप असल्याचं समोर आलं आहे.

SIT समितीच्या अध्यक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकारासाठी एसआयटी समिती गठीत करण्यात आली आहे. या एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. याशिवाय, या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्याऩ, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

डॉ. पल्लवी सापळेंवर भ्रष्टाचाराचा आरोप

डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील SIT समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. पल्लवी सापळे या ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे हॉस्पिटल रुग्णालयाच्या अधिष्ठाता (Dean) आहेत. जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे आरोप आहेत. डॉ. पल्लवी सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता. जेजे रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा मुद्दा विधानसभेत सुद्धा चर्चेत आला होता.
गोलमाल है भाई, सब गोलमाल है! भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळेच पुणे अपघात प्रकरणातील SIT च्या अध्यक्ष

डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर असलेले आरोप कोणते?

डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आरोप करण्यात आले होते की, डॉ. सापळे भाड्याची गाडी वापरतात आणि महिन्याला त्याचं एक लाख रुपयांचे बिल शासनाला सादर करतात. हा खर्च 70 ते 80 लाख रुपये आहे. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय त्यांनी 13 लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान दिल्याचं सांगितलं. असे आरोप डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News 11 PM Top Headlines 11 PM 30 March 2025 रात्री 11 च्या हेडलाईन्सRich Thief Story Special Report : अट्टल चोराचा 1 कोटींचा बंगला,लोकांना लुटून श्रीमंत होणारा गजाआडRaj Thackeray Speech : औरंगजेबची कबर दिसली पाहिजे,  राज ठाकरेंची सर्वात मोठी मागणी ABP MAJHAChhattisgarh Naxalite : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Embed widget