एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime: काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime: भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे मारण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कठोर कारवाईचे आश्वासन

Devendra Fadnavis on Pune Navale bridge Rasta Roko: नसरापूर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. काहीजण या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. नरसापूर येथील मुलीच्या हत्येनंतर भोर तालुक्यासह पुण्यात संतप्त पडसाद उमटले होते. शनिवारी संध्याकाळी नसरापूरमधील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पूल (Navale bridge) गाठला होता. याठिकाणी तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. रात्री उशीरा मुलीचे आई-वडील हे पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घ्यायला राजी झाले. मात्र, त्यावेळी काहीजण त्यांना आंदोलन मागे घेऊ देत नव्हते. ते त्यांना अडवत होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते रविवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Nasrapur Rape Case)

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नसरापूर प्रकरणावरुन विरोधकांना फटकारले. मी काल स्वत: पिडीतेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि केस चालणे, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत. लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न  ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तसे पत्र आम्ही पिडीतेच्या कुटुंबाला दिले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

ही घटना गंभीर आहे, रोष साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही चुकीचे नाही. काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, त्यांनी परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. ते लोक कोण आहेत, हे लक्षात आले आहे. मात्र, मुलीच्या वडिलांनी जी काही भूमिका घेतली, त्यासाठी मी आभारी आहे. आम्ही आरोपीवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही माहिती घेत आहोत. मात्र, या गुन्ह्यातून तो बाहेर येऊच शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

आणखी वाचा

नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....

न्यायासाठी चिमुकलीचा मृतदेह घेऊन नवले पुलावर रास्तारोको, पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली, आंदोलकांचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget