Mumbai News : 'मातोश्री'चे खोके बंद झाल्याची रश्मी वहिनींना खंत, सगळ्याच्या सूत्रधार रश्मी ठाकरे, जहरी वार करत दीपाली सय्यद शिंदे गटात!
Mumbai News : दीपाली सय्यद यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. "मुंबई मनपातील खोके 'मातोश्री'वर बंद होण्याची खंत रश्मी ठाकरेंना आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर आहेत, सगळ्याच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत", असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला.
Mumbai News : शिवसेनेच्या ठाकरे (Thackeray) आणि शिंदे (Shinde) गटातील सलोख्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. "एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या. यावेळी त्यांनी थेट रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. "मुंबई मनपातील (BMC) खोके 'मातोश्री'वर बंद होण्याची खंत रश्मी ठाकरेंना आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे (Sushma Andhare) चिल्लर आहेत, सगळ्याच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत", असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला.
दीपाली सय्यद काय म्हणाल्या?
माझा शिंदे गटात प्रवेश होत आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहे. प्रवेशासंदर्भात कसं, काय, कधी ही चर्चा करण्यासाठी भेट होणार आहे. मला शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती स्वीकारेन. मला शिंदे यांनी राजकारणात आणले. म्हणून त्यांच्यासोबत जाते आहे. मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी वहिनी नाराज आहेत. मी शिंद-ठाकरे गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला, पण नाही आले म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र
यावेळी दीपाली सय्यद यांनी कारागृहात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. "संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत आहे. तोंडाने पक्ष फोडून त्यांनी पाप केलं. त्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळत आहे. संजय राऊत यांना जी शिक्षा झाली ती त्यांच्या पापाची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहे. हे दोन गट त्यामुळेच झाले आहेत.
ही गद्दारी नाही
पक्ष सोडण्याचं ठोस कारण हेच आहे. गद्दारीचं राजकारण म्हणतात, पण ही गद्दारी नाही हा हक्क आहे. एक राजा असतो, त्याच्या आजूबाजूला सेनापती असतात, त्यांचेही अधिकार असतात, माझ्या पदरी काय येणार, माझ्या वाट्याला काय येणार, की हुलकावणी देत असतात, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू मांडली.
दीपाली सय्यद यांची यापूर्वीची भूमिका
दरम्यान, दीपाली सय्यद यांनी यापूर्वी अनेकवेळा आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यांनी 'मी सध्या वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे, असं म्हटलं होतं. याआधी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आपण लवकरच कोणत्या गटात हे जाहीर करु असं सांगितलं होतं. त्यामुळे आता दीपाली सय्यद यांचा वेट संपला आहे, त्यांनी शिंदे गटात जाण्याची भूमिका घेतली आहे.
VIDEO : Deepali Sayed on Rashmi Thackeray : दीपाली सय्यद यांचे रश्मी ठाकरेंवर आरोप