एक्स्प्लोर

Dattatray Bharne : हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, दत्तामामा भरणेंच्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या

Dattatray Bharne : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अजितदादांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dattatray Bharne, इंदापूर : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. 4) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही आठवड्यांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालाय. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे  असे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील. राष्ट्रवादीची विचारधारा ते मांडत असतील ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचे स्वागत होईल", असं मतंही शरद पवारांनी व्यक्त केलं. 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या निर्णयावर त्यांचे विरोधक आणि अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हर्षवर्धन पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. कारण हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांनाच माहिती आहे. अद्यापपर्यंत महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मला तिकीट मिळणार आहे का नाही? हे मला देखील माहित नाही.
त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी असा निर्णय का घेतला हे त्यांनाच विचारावा लागेल असं दत्तात्रय भरणे म्हणाले. 

2019 मध्ये दत्तात्रय भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांचा पराभव

हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी इंदापुरात महायुतीची उमेदवारी देखील मिळवली होती. मात्र, त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा जवळपास 2 हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी काळातही दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्येच लढत होईल, असे बोलले जात आहे. 

हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश कधी ?

इंदापूर विधानसभेची जागा विद्यमान आमदार असलेल्या पक्षाला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरा पर्याय आपण काढू असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मात्र, दुसरा पर्याय स्वीकारणे आमच्या कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. तसे केल्यास तो माझा व्यक्तीगत निर्णय ठरला असता. मात्र प्रश्न जनतेचा आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय. माझ प्रवेश कधी होईल? हे माझ्या हातात नाही, असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. पवार साहेबांनी आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. येणाऱ्या काळात राजकिय वनवास राहणार नाही. नवीन विकासाचे पर्व सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आपला रोल फक्त पक्षात प्रवेश करणं आहे बाकीचा रोल त्यांचा आहे तारीख त्यांची असेल, असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget