एक्स्प्लोर

मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!

आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास सांगताच आमचा घरचा विषय ही संपला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

सोलापूर : सलग सहा वेळा मोठ्या मताधिक्क्याने माढा (madha) विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अजितदादा गटाचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मात्र अजितदादांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावेळी ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत असून त्यांनी शरद पवारांची यासंदर्भात अनेक वेळा भेट घेतली आहे. कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad pawar) यांचेकडे रणजीत शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिका घेतल्याने आता अजितदादांच्या (Ajit pawar) अडचणीत वाढ होणार आहे. महायुतीतील तुमचं फिक्स तिकीट का नाकारता या विषयावर त्यांनी तो विषय आता संपलेला आहे, अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा व महायुतीला निरोप दिला. 

आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास सांगताच आमचा घरचा विषय ही संपला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. भाजप आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील देखील तुतारी कडून निवडणूक लढवण्यास प्रयत्नात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत, निवडणुकीत कोणीही येऊ दे आम्हाला फरक पडणार नाही, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी स्पष्ट केली. काही दिवसापूर्वी अजितदादांची जन सन्मान यात्रा माढ्यात आली असता बबनदादा शिंदे यांनी त्यास हजेरी लावत मोठे शक्ती प्रदर्शनी केले होते. आता शरद पवारांकडे उमेदवारी मागितल्याने अजित पवार यांना माढ्यात कोणाला उभे करायचे हा प्रश्न पडणार आहे. 

अपक्ष लढविण्याची तयारी

शरद पवार यांनी रणजीत शिंदे यांना तुतारी न दिल्यास राष्ट्रवादी अर्थात घड्याळावर उभे न राहता अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवण्याची भूमिका बबनदादांनी घेतल्याने आता अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार कोण हा प्रश्न पुन्हा अनुत्तरीत राहणार आहे. काही दिवसांपूर्वी अजितदादांसोबत माढा आणि करमाळा या दोन्ही ठिकाणी स्टेजवर दिसणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी आता मात्र तुतारी न मिळविल्यास अपक्ष मुलाला उतरवणार अशी भूमिका घेतल्याने बबन दादांचा अजित पवार यांच्यावरील विश्वास संपला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार शिंदे यांचे दुसरे बंधू आणि करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच गेल्यावेळी प्रमाणे आपण याही वेळी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, अजित दादांना आता या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण द्यायचा हा पेच निर्माण होणार आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच वळणं घेत असून माढा, मोहोळ, करमाळा आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चुरशीच्या लढतींपूर्वीच उमेदवारीवरुन चांगलीच रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. तर, शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे एकामागून एक धक्के ते देताना दिसून येतात. 

हेही वाचा

एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  5 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBopdev Ghat Pune : बोपदेव घाटात अपहरण करून तरूणीवर अत्याचारBeed Dasara Melava : दसऱ्याला बीडमध्ये दोन मेळावे; नारायणगडावर जरांगेंचा मेळावाABP Majha Headlines :  4 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका; न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर
अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका; न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर
CM शिंदेंच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात, 12 पोलीस जखमी, नाशिकमधील घटना
CM शिंदेंच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात, 12 पोलीस जखमी, नाशिकमधील घटना
अखेर दोन महिन्यानंतर 'त्या' विदेशी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा धाडलं मायदेशी, नेमकं प्रकरण काय?
अखेर दोन महिन्यानंतर 'त्या' विदेशी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा धाडलं मायदेशी, नेमकं प्रकरण काय?
Sharad Pawar : देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
Embed widget