Dattatray Bharne : मोठी बातमी : अजितदादांचे मंत्री भरणे मामा नाराज, सुट्टीच्या नावाखाली सहकुटुंब परदेशात गेले
Dattatray Bharne, Indapur : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे नाराज असल्याने मंत्रीपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला नाही
Dattatray Bharne, Indapur : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्ती केली होती. शिवाय, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरु असल्याचेही समोर आले होते. दरम्यान, आता अजित पवारांच्या मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे देखील नाराज असल्याचे समोर आले आहेत. दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे क्रीडा खाते देण्यात आले होते.
दत्तात्रय भरणे नाराज असल्याने मंत्रीपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला नाही. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान, त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय भरणे हे सहकुटुंब परदेशात गेले आहेत. क्रीडा खाते मिळाल्याने ते नाराज आहेत . गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीसाठी सहकुटुंब परदेशात गेले आहेत. ते थेट मंगळवारी भारतात येतील अशी माहितीही त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाने दिली आहे.
क्रीडा खातं मिळाल्याने दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अजूनही आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारलेला नाही. नाराज असल्याने ते सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती आहे. दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून निवडून आले आहेत. मागील सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू म्हणून दत्तात्रय भरणेंची ओळख आहे. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये त्यांना क्रीडा खातं देण्यात आलंय. ते त्यांच्या नाराजीचं कारण ठरलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक दिवस उलटून देखील त्यांनी कारभार स्वीकारलेला नाही. दरम्यान, आता ते सुट्टीच्या नावाखाली सहकुटुंब परदेशात गेले आहेत. त्यांच्या नाराजीची चर्चा मतदारसंघात देखील आहे.
अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
अजित पवार - अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
अदिती तटकरे - महिला व बालविकास
माणिकराव कोकाटे - कृषी
बाबासाहेब पाटील - सहकार
नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
मकरंद जाधव - मदत आणि पुनर्वसन
इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
भाजपकडे असणारी खाती
देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
गणेश नाईक - वनमंत्री
मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
माधुरी मिसाळ - शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय
आकाश फुंडकर - कामगार
जयकुमार गोरे - ग्रामविकास आणि पंचायती राज
शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक उपक्रम
आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान
नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठली खाती?
कॅबिनेट मंत्री
1.उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा
2.प्रताप सरनाईक - वाहतूक
3.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
4.भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन
5.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
6.दादा भूसे - शालेय शिक्षण
7.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
8.संजय राठोड - मृदा व जलसंधारण
9.संजय शिरसाट - सामाजिक न्याय
राज्यमंत्री
10. योगश कदम - ग्रामविकास, पंचायत राज
11. आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
इतर महत्त्वाच्या बातम्या
Ghatkopar Accident : कुर्ल्यातील घटना ताजी असतानाच आता घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडलं