VidhanSabha Election: महायुतीत मिठाचा खडा! शिंदेंच्या आमदाराचा 120 जागा लढवण्याचा दावा; भाजप अन् अजितदादा काय भूमिका घेणार?
VidhanSabha Election: आगामी विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामध्ये लढल्या जाणार आहेत. शिवसेना 120 जागा लढवणार आहे.आमचं टार्गेट हे 100 जागा जिंकण्याचं आहे, असं वक्तव्य शिंदेंच्या आमदारांने केलं आहे.
मुंबई- राज्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू केली आहे. या निवडणुका जाहीर होण्याआधीच जागावाटपावरून धुसफूस दिसून येत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन विषय चर्चेत आला आहे. शिवसेना राज्यात 120 जागा लढवेल असं मोठं वक्तव्य संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलं आहे. त्यामुळे आता गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गायकवाड यांनी, 'आगामी विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामध्ये लढल्या जाणार आहेत. शिवसेना 120 जागा लढवणार आहे.आमचं टार्गेट हे 100 जागा जिंकण्याचं आहे.' असं म्हणत संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमचं टार्गेट 100 जागा जिंकायची आहे. त्यासाठी आम्हाला कोणाच्या चेहऱ्याकडं बघायचं नाही. आमचं एकचं टार्गेट आहे शिवसेनेचं की राज्यात शिवसेनेचे 100 आमदार निवडून आणायचे आहेत. शिवसेनेचे 100 आमदार आम्हाला निवडून आणायचे आहेत असं म्हटल्यानंतर पत्रकारानी त्यांना जागावाटप झालं का असा सवाल केला त्यावर बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, आम्ही 120 जागा मागणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचबरोबर अमित शाह यांनी सांगितलं आहे, महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालीच लढल्या जातील असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळं आमच्याकडे वेगळा काही विषय नाही. आज राज्यात १८ तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याने पाहिलेला नाही. आपल्याच बुलढाण्यात मुख्यमंत्री चौथ्यांदा येत आहेत. त्याआधी कधी मुख्यमंत्री येत देखील नव्हते. आता राज्यातील सर्वात जास्त काम करणारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं म्हणत आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शड्डू ठोकला आहे.
आगामी एक-दोन महिन्यामध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती, आघाड्यांमध्ये जागावाटपांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच पक्षांची चर्चा आणि जागावाटप झालं नसताना संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी हे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणालेत संजय गायकवाड?
येत्या विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वामध्ये लढल्या जातील. शिवसेना 120 जागा लढवणार आहे. आमचे टार्गेट हे 100 जागा जिंकण्याचे आहे, पत्रकारांनी त्यांना जागावाटप झालं का असा सवाल केला त्यावर बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, आम्ही 120 जागा मागणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.आता नेमके महायुतीत जागा वाटप कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Video - Sanjay Gaikwad : विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात; शिवसेना 120 जागांवर लढणार