एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hiraman Khoskar: क्रॉस व्होटिंगचा संशय असणाऱ्या आमदाराला काँग्रेस हायकमांडच्या उलट्या गेमची कुणकुण लागताच धडकी भेटली, तातडीने नाना पटोलेंना भेटणार

Maharashtra Politics: विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या फुटीर आमदारांचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्याची योजना काँग्रेस हायकमांडने आखली आहे. पाच आमदारांबाबत उलटा गेम होण्याची शक्यता. आमदार धास्तावला

नाशिक: नाशिकचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय असणाऱ्या आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election 2024) तिकीट कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने खोसकर यांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रॉस व्होटिंग प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा पुन्हा एकदा काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. आता  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचीही भेट घेऊन हिरामण खोसकर त्यांच्यासमोर आपली बाजू  मांडणार आहेतय  ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting) केले त्यांची नावे उघड करा. विधानसभाचे तिकिट द्यायचे नसेल तर देऊ नका, मात्र आरोप करू नका,  अशी बाणेदार भूमिका खोसकर यांनी घेतली आहे.  

हिरामण खोसकर काय म्हणाले?

मी 100 टक्के क्रॉस व्होटिंग केलेले नाही. मी मिलिंद नार्वेकरांना मतदान केले होते. माझी पक्षाला विनंती आहे की, मी चुकलेले नाही, मी 100 टक्के पार्टीला मतदान केले आहे. मी आजही काँग्रेससोबत आहेत, उद्याही पक्षासोबत आहे. काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. मी बाळासाहेब थोरात साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. साहेब तुम्ही आम्हा 7 लोकांना मिलिंद नार्वेकर यांना मतदान करायला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही रुममध्ये जाऊन मतदान केले. आता मुंबईत जाऊन नाना पटोले यांची भेट घेणार आहे. ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यासमोर काय बोलणार? पण मी त्यांच्यासमोर पुन्हा एकदा माझी बाजू मांडणार आहे, असे हिरामण खोसकर यांनी सांगितले.

काँग्रेस हायकमांडचा उलटा गेम

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. या आमदारांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस व्होटिंग करुन गद्दारी करणाऱ्या या आमदारांबाबत एक वेगळीच चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश  काँग्रेस हायकमांडने दिले आहेत. 5 आमदारांना विधानसभेला तिकीट देऊ नका, असे हायकमांडने नाना पटोले यांना सांगितल्याचे समजते. या पाच आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळेच आता हिरामण खोसकर हे तातडीने नाना पटोले यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस हायकमांडच्या रडारवर असलेले 5 संभाव्य आमदार कोण?

* सुलभा खोडके- अमरावती
* झिशान सिद्दीकी- वांद्रे पूर्व
* हिरामण खोसकर- इगतपुरी (अ.जा)
* जितेश अंतापूरकर- देगलूर (अ.जा)
* मोहन हंबर्डे- नांदेड दक्षिण

आणखी वाचा

काँग्रेसच्या गळाला लागलेल्या आमदारांची ओळख पटली; क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर एका आठवड्यात कारवाई!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युलाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Embed widget