एक्स्प्लोर

"प्रकाश आंबेडकरांनी एकत्र लढावं", वर्षा गायकवाड यांचं थेट आवाहन; युतीसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले?

काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असे आवाहन केले आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते बाळासाहेब आंबेडकर (Prakash Aambedkar) यांनी मला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्याला हवा होता. ते आमचे समाजाचे नेते आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) नातू आहेत. आम्हीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आम्ही काम करत आहोत. माझे पक्षातील आणि मुंबईतील काम पहा, हे काम पाहून तरी बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पाठिंबा द्याला हवा होता. परंतु दुर्दैवाने तस झालं नाही असे विधान खासदार वर्षा गायकवाड यांनी केले. त्या नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधत होत्या. बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी आणि संविधानासाठी एकत्र लढलं पाहिजे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

अदाणी समूहासाठी नियमांना बगल देण्याचा प्रयत्न  

दुसरीकडे वर्षा गायकवाड यांनी मुंबईमध्ये मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धारावी झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन यावर बोलताना राज्यातील एकनाथ शिंदे तसेच देशातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सडकून टीका केली. मुंबईमध्ये मोदानी अँड कंपनीचा महाजमीन घोटाळा जोमात सुरू आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या मोक्याच्या सार्वजनिक जागा नाममात्र दरावर प्रस्थापित नियमांना आणि प्रक्रियेला बगल देऊन अदानींच्या समूहाला भेट देण्याचा सपाटाच शिंदे सरकारने लावला आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली कुर्ला येथील मदर डेअरीसाठी पूर्वी वापरण्यात येणारी शासकीय जमीन याच महाघोटाळ्याचा एक भाग असून या महाघोटाळ्याच्या विरुद्ध संसदेत, विधानसभेत, कोर्टात आणि रस्त्यावर उतरून लढू पण मुंबईकरांची लूट होऊ देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

नियमांना डावलून निर्णय- वर्षा गायकवाड

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अदानीसाठी मुंबईतील भूखंड अत्यंत कमी दराने देण्याचा शिंदे भाजपा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून हा एक मोठा जमीन घोटाळा आहे. मदर डेअरीची 21एकर जमीन अदाणी यांना देताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन केलेले नाही. जमीन देण्याआधी जाहिरात दिली पाहिजे. कलेक्टर यांनी प्रस्ताव बनवनू तो शासनाला पाठवला पाहिजे व नंतर योग्य त्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. पण या भूखंड हस्तांतरणाप्रकरणी अशी कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही जमीन अदाणी यांना दिल्याचा शासन आदेस 10 जूनला जारी केला आहे. अशा प्रकारचा व्यवहार 1971 च्या कायद्यानुसार होणे अपेक्षित आहे. पण अदाणी हे पंतप्रधानांचे मित्र असल्याकारणाने या नियमांना बगल देण्यात आली आहे, असे गायकवाड म्हणाल्या.

सर्व धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे ही तमाम धारावीकरांची भूमिका असताना, धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली मिठागरे, जकात नाक्यासाठी वापरण्यात येणारी महापालिकेची जमीन, मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जमीन किंवा कुर्ला डेअरीची जमीन अदानींच्या DRPPL ला प्रस्थापित नियमांना बासनात गुंडाळून का दिली जात आहे? कुर्ला डेअरीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची ऑर्डर महत्त्वाची आहे की भाजपच्या मंत्र्यांची?  असे प्रश्न उपस्थित करून कुर्ला येथील नेहरू नगरच्या नागरिकांनी या हिरवळीच्या भूखंड संवर्धनासाठी सार्वजनिक उद्यान निर्माणासाठी लोकचळवळ निर्माण केली आहे. या चळवळीत काँग्रेस पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर राहू व मोदानी अँड कंपनीच्या मुंबई गिळण्याच्या मनसुब्यांना पराभूत करू असेही गायकवाड म्हणाल्या.

बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांचे स्मारक कधी पूर्ण होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात आढावा बैठक घेण्यास शिंदे सरकारला वर्षभरात वेळ मिळाला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना या स्मारकाच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात होता. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्यासाठी कार्यरत होती, स्मारकावर हवेचा परिणाम होणार नाही यासाठी विविध भागात जाऊन माहिती घेतली  होती व त्यावर चर्चाही केली होती. बाबासाहेबांच्या स्मारकांप्रमाणेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही दुर्लक्षित आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे जलपूजन केले होते. पण अजून या स्मारकाची एक वीटही रचली गेली नाही. भारतीय जनता पक्षाला महापुरुषांची आठवण फक्त निवडणुकीतच होते, असेही गायकवाड म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, खजिनदार संदीप शुक्ला, मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते, निजामुद्दीन रायीन आदी उपस्थित होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
Ahilyanagar Leopard: 15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
Ahilyanagar Leopard: 15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
Embed widget