एक्स्प्लोर

'लाडकी बहीण'ला काँग्रेसचं 'महालक्ष्मी योजने'ने उत्तर, महिन्याला 2 हजार देणार, महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात काय काय?

एकीकडे राज्य सरकारकडून अनेक लोकप्रिय निर्णय घेतले जात असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये जाहीरनाम्यावर चर्चा चालू आहे. काँग्रेसकडून जाहीरनाम्यात अनेक मोठ्या योजनांचा समावेश केला जाऊ शकतो.

दिल्ली : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) घोषणा होऊ शकते. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील महायुती सरकारकडून धडाडीने अनेक निर्णय घेतले जात आहेत. शिंदे सरकारने नुकतेच मुंबईच्या वेशीवरील पाच टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांचा टोल माफ केला आहे. सरकारच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे काँग्रेस (Congress) पक्षातही राजधानी दिल्लीमध्ये जाहीरनाम्यावर खलबतं चालू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सरकार राज्यातील जनतेला अनेक मोठी आश्वासनं देणार असून यामध्ये महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला (Mazi Ladki Bahin), महालक्ष्मी योजनेने (Mahalaxmi Yojana) उत्तर दिले जाणार आहे. 

महालक्ष्मी योजनेत महिलांना प्रतिमहिना 2000 रुपये 

राजधानी दिल्लीत सध्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चर्चा केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महिला, युवक, शेतकरी, कामगार, अनुसूचित जाती, जमाती अशा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी काँग्रेस अनेक आकर्षक योजना लागू करण्याचे आश्वासन देणार आहे. विशेष म्हणजे या योजनांसाठी नावेदेखील ठरवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. सध्याच्या महायुती सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जाते. सरकारच्या या योजनेची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. हीच बाब लक्षात घेता काँग्रेस पक्षदेखील सत्तेत आल्यास राज्यातील महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रतिमहिना 2000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या योजनेसाठी साधारण 60 हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.  

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास, आम्ही कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना लागू करू, असे आश्वासन काँग्रेस देण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. ही कर्जमाफी साधारण 28 हजार कोटींची असेल.

स्री सन्मान योजनाः

या योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पूर्णपणे मोफत चालवली जाण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. या योजनेचा समावेश जाहीरनाम्यात केला जाऊ शकते. या योजनेसाठी 1 हजार 460 कोटीचा निधी अपेक्षित आहे.

सर्वांना 25 लाख रूपयांचं विमा कवच

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुटुंब रक्षण योजनेचेही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सरकार आल्यास काँग्रेसतर्फे सर्वांना 25 लाख रूपयांचं विमा कवच दिलं जाऊ शकतं. या योजनेसाठी 6 हजार 556 कोटीचा निधी अपेक्षित आहे.

युवकांना हमी 

युवकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसतर्फे मोठी आश्वासनं दिली जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार बेरोजगारांना महिन्याला 4000 रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. या योजनेअंतर्गत साधारण 6.5 लाख युवकांना हा भत्ता दिला जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा :

Toll Waiver Mumbai : मुंबईतील पाच नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, सरकारचा लोकप्रिय निर्णयांचा धडाका, राज्याच्या तिजोरीवर 5 हजार कोटींचा बोजा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget