ठाकरे नाव न लावता मैदानात या, मग तुम्हाला तुमची किंमत कळेल; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Maharashtra Political Crisis: गुवाहटीला गेलेले स्वखुशीने गेले नाही. कोणीही पक्ष सोडत नाही आहे. आम्हीही खुशीने पक्ष सोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सारख्या लोकांमुळे सोडावा लागला: निलेश राणे
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नशिबाने नेते झाले आहेत. त्यांचं स्वकर्तृत्व शून्य आहे. त्यांनी असे कुठले मोठे आंदोलन गाजवले आहेत, असे कुठले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले आहेत. ते (उद्धव ठाकरे) म्हणतात ठाकरेंचं नाव वापरू नका, आम्ही उलट सांगतो उद्धव ठाकरेंना तुम्ही ठाकरे नाव न वापरता आणि रस्त्यावर या...मग तुम्हाला तुमची किंमत कळेल, असं भाजप नेते निलेश राणे म्हणाले आहेत. कुडाळ येथे एका आयोजित कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ''गुवाहटीला गेलेले स्वखुशीने गेले नाही. कोणीही पक्ष सोडत नाही आहे. आम्हीही खुशीने पक्ष सोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सारख्या लोकांमुळे सोडावा लागला. आमदारांना भेटत नाही, कार्यकर्त्यांना काय भेटत असतील.''
आदित्य ठाकरेंवर निलेश राणे बरसले
निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही स्वकर्तृत्वाने काही केलं नाही. ते आदित्य ठाकरे नेते असल्यासारखे भाषण देतात. अरे तुम्ही आहे कोण, म्हणे विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो. शिंदे, सचिन अहिरे, आणि हे तिसरे , एका मतदार संघात उद्धव ठाकरेंना तीन आमदार निवडून आणावे लागले. एवढी खात्री होती, तर मुलाच्या मतदार संघातील तीन आमदार निवडून आणावे का लागले. उद्धव ठाकरेंनी आमदारक्या वाटल्या नसता तर मुलगा निवडून सुद्धा आला नसता. म्हणून जमिनीवर या, तुमचं स्वकर्तृत्व काही नाही. हवेत उडायचं बंद करा. महाराष्ट्र सगळे बघतोय आणि चीड आहे महाराष्ट्राला.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांची बाजू मांडताना निलेश राणे म्हणाले, ''पक्ष संपवण्याची कुणाची इच्छाच नसते, स्वतःची इच्छा असते की, आम्हाला चांगली वागणूक मिळावी. आमच ऐकून घेतलं जावं, हीच मागणी असते. दुसरे त्यांना काय पाहिजे. ते सगळे बाहेर पडताना पक्ष संपवण्यासाठी बाहेर पडले नाही. साहेब (नारायण राणे) बाहेर पडताना विरोधी पक्षनेता होते, कोणाला काय पाहिजे अजून. पण यांना इज्जत नको असेल तर एक ना एक दिवस असं होतं. म्हणून पक्ष संपवणं महत्वाचं नाही तर ते ते स्वतःच्या कर्माने संपतील.''
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Political Crisis : आता उदय सामंतही नॉट रिचेबल, एकनाथ शिंदे गटात सामिल होणार!
Sanjay Raut : संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य, गुवाहाटीमधून 40 आमदारांचे मृतदेह येतील
Maharashtra Political Crisis Sanjay Raut : संजय राऊत यांचे बंडखोरांना आव्हान, एका बापाचे असाल तर...