एक्स्प्लोर

Supriya Sule : महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आमचे खासदार पीएम मोदींना भेटणार, सुप्रिया सुळेंनी कारण सांगितलं; FCRA आणि डिलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या सोमवारी भेटण्याचं कारण सांगितलं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेण्याचं कारण सांगितलं. याशिवाय केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरएला दुरुस्ती विधेयकाला विरोध राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारसंघ फेररचना विधेयक आलेलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पीएम मोदींना का भेटणार? 

एक दोन खासदारांची भूमिका होती की महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत. दुर्दैवानं संसद चालत नाही. त्यामुळं माननीय पंतप्रधानांना जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ज्यात पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील. सातत्यानं शहरीकरणात होणारे मोठे प्रश्न आहेत. सगळ्या खासदारांना ५ कोटी रुपयांचा विकासनिधी मिळतो, त्याच्या अंमलबजावणीला आव्हानं येतात. महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित मदत खासदारांना मिळत नाहीत,असे प्रश्न जे विकासाच्या चौकटीतील आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.  आपण हे सगळे प्रश्न घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ या का या भूमिकेतून आठ  खासदारांनी मोदींकडे वेळ मागितली होती. आमच्या आठ खासदारांना पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेतील कार्यालयात भेटीची वेळ दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलावलं होतं, आम्हाला नाश्त्याला बोलावलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

FCRA ला विरोध

एफसीआरएचं बिल आताच्या ज्या स्वरुपात आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध आहे, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. जर विधेयक आलं आणि सरकार चर्चेला बसलं, त्यानंतर ते जेपीसीकडे पाठवलं तर आमची चर्चा करण्याची तयारी आहे. एफसीआरए बिल परत घ्यावं किंवा मागं घ्यायचं नसेल तर ते जेपीसीकडे पाठवावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

जंतरमंतर आणि नीट बाबत चर्चा झाली होती तेव्हा याबाबत एसआयटी नेमून नेमकं काय झालं ते भारत सरकार आणि प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे की पॅलेट गनचा वापर कसा झाला, संसदेत टिअर गॅसचा आवाज ऐकायला येत होता. पार्लमेंटची दारं बंद झाली होती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.   

डिलिमिटेशनचं बिल आलेलंच नाही, त्यावर कसं भाष्य करणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलं. या सगळ्या बिलांची चर्चा इंडिया आघाडी बैठक दररोज सकाळी 10 वाजता खर्गे यांच्या नेतृत्त्वात होते. डिलिमिटेशनचं बिल आलेलं नाही तोपर्यंत त्यावर कसं भाष्य करणार, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. बिल आल्यावर काँग्रेस, सपा, शिवसेना, टीएमसी, यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आमचे खासदार पीएम मोदींना भेटणार, सुप्रिया सुळेंनी कारण सांगितलं; FCRA आणि डिलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट
महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आमचे खासदार पीएम मोदींना भेटणार, सुप्रिया सुळेंनी भेटीचं कारण सांगितलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget