एक्स्प्लोर

Chitra Wagh: महिलांचा छळ करणारे 'लांडगे', एक-दोघांना ठेचलेच पाहिजे; नाशिक धर्मांतर प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या

Chitra Wagh: नाशिकमधील अशोक खरात प्रकरण आणि आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Chitra Wagh: "महिलांवर अत्याचार करणारे हे समाजात वावरणारे 'लांडगे' आहेत. अशा नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, एक-दोघांना ठेचले पाहिजे," अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपला संताप व्यक्त केला. नाशिकमधील अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण आणि आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज कडक भूमिका मांडली.

नाशिकमधील आयटी कंपनीत झालेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, पॉश ॲक्टमध्ये बदल होणे गरजेचे आहे. ज्या कंपनीच्या सहली जातात तिथे पण महिलांचा छळ केला जातो. व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमधून देखील महिलांना छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे याच्या बदल होणे गरजेचे आहे. 10 पेक्षा जास्त महिला असतील तिथे पॉश ॲक्ट लागू होतो. हे एक विभागाचे काम नाही. यासाठी भरारी पथक निर्माण केलं गेलं पाहिजे. ज्या गोष्टी कायद्यात सांगितल्या आहेत, त्याच्या तरतुदी झाल्या पाहिजे. 90 दिवसाच्या आत न्याय नाही मिळाला तर दंड झाला पाहिजे, अशी पण एक तरतूद यात केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत. ज्या महिलांवर छळ करण्यात आले ते लांडगे आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. एक, दोघांना ठेचले पाहिजे. अनेक महिला पुढे येत नाहीत. मात्र, माझ्या प्रयत्नांना यश येईल. मी त्याचा पाठपुरावा करणार आहे, असे त्यांनी म्हटले. 

Chitra Wagh on Ashok Kharat Case: अशोक खरातला ठेचण्याचे काम सुरू

अशोक खरात प्रकरणावर चित्रा वाघ म्हणाल्या की, अशोक खरातला ठेचण्याचे काम सुरू आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही. तीन महिन्या अगोदर ही कुणकुण लागली होती. त्याचे पुरावे आले, मग खरातवर कारवाई झाली. एखाद्याला पकडणे सोपे आहे. पण, त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड असते. खरातच्या मागे ईडी, एसआयटी, सीबीआय सगळे लागलेले आहेत. रोज त्यांचे प्रकरण बाहेर येत आहे. महिलांनी अजूनही पुढे येऊन तक्रारी कराव्यात. त्यांना आपण शिक्षा दिल्या शिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले. 

Chitra Wagh: महिला आयोगाचे अध्यक्षपद लवकरच भरणार

दरम्यान, महिला आयोगाच्या रिक्त पदाबाबत विचारले असता चित्रा वाघ यांनी सांगितले की, महिला आयोगाच्या रिक्त अध्यक्ष पदाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, महिला आयोगाचे पद जरी रिकामे असले तरी बाकीचे अधिकारी काम करत आहेत. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील भेटलो. बारामतीची पोटनिवडणूक झाल्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद भरले जाईल. कारण ते पद राष्ट्रवादीकडे होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

आणखी वाचा 

Nida Khan : धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानचं मुंब्रा कनेक्शन! फरार असताना मुंबईत डॉक्टरांची भेट; मेडिकल सर्टिफिकेट अन् विश्रांतीचा सल्ला, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget