एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal Sharad Pawar : शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ वेटिंगवर, भेट घेऊनच परतणार, भुजबळांचा पवित्रा

Sharad Pawar Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ एक तासापासून वाट पाहत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुंबई :  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे  शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी दाखल झाले आहेत. मात्र, छगन भुजबळ यांना शरद पवारांकडून भेट देण्यात आलेली नाही.  छगन भुजबळ एक तासापासून वेटिंगवर असल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांनी दोन दिवसांपासून भेटी गाठी आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले होते. मात्र,  आज छगन भुजबळ थेट शरद पवार यांची वेळ न घेत सिल्वर ओकवर दाखल झाले. अद्याप छगन भुजबळ वेटिंगवर  असल्याचं समोर आलं आहे. 

छगन भुजबळ वेटिंगवर  

शरद पवार यांच्याकडून आज केवळ दोन व्यक्तींना भेटीसाठी वेळ देण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. यापैकी एक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मिलिंद नार्वेकर त्यांना सिल्वर ओक मधून बाहेर पडल्याची माहिती आहे. 

भेट घेतल्यानंतर बाहेर पडणार, छगन भुजबळ यांचा पवित्रा 

छगन भुजबळ मागील अर्ध्या तासापासून शरद पवार यांची वाट पाहत बसले आहेत. शरद पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना वेळ देण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर शरद पवारांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर देखील छगन भुजबळ यांना भेट दिलेली नाही. शरद पवार यांची वेळ न घेताच छगन भुजबळ वेळ न घेताच भेटायला पोहचले आहेत. कुणालाही कुठल्याच प्रकारची कल्पना नसताना छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाल्यानं गोंधळ निर्माण झाला. 

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडणार असा पवित्रा छगन भुजबळ यांनी घेतल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. छगन भुजबळ यांना शरद पवार यांच्याकडून भेटीसाठी वेळ देण्यात येतो का ते पाहावं लागेल.  भुजबळ अद्याप शरद पवार यांची वाट पाहत बसले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 

छगन भुजबळ यांनी काल बारामतीत आरक्षणाच्या मुद्यावरुन शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेनंतर छगन भुजबळांवर टीकेची झोड सुरु झाली होती. त्यानंतर आज भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं राजकीय क्षेत्रात तर्क वितर्क सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Chhagan Bhujbal : कटुता संपवण्याचं पहिलं पाऊल.., छगन भुजबळ शरद पवार भेटीबद्दल राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

Chhagan Bhujbal Meets Sharad Pawar : छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSiddhiVinayak Ganpati Aarti : सिद्धीविनायक गणपती आरती 12 सप्टेंबर 2024 ABP MajhaTOP 70 : 07 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines : 07.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Embed widget