लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
याबाबत असलेल्या गैरसमजूती लोकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण करतात. या लेखाच्या माध्यमातून लसीकरणासंबंधी असलेल्या गैरसमजूती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Vaccination Myths and facts: लसीकरण हे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्याचा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग आहे. हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला रोगांशी लढण्यासाठी तयार करते, तरीही याबाबत असलेल्या गैरसमजूती लोकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण करतात. या लेखाच्या माध्यमातून लसीकरणासंबंधी असलेल्या गैरसमजूती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Vaccination)
गोवर, इन्फ्लूएंझा, हिपॅटायटीस आणि कोविड-19 सारख्या प्राणघातक संसर्गांपासून संरक्षण करण्यासाठी लोकांना लसीकरणाचा सल्ला दिला जातो. त्याचे फायदे असूनही, बऱ्याच व्यक्ती गैरसमजूती आणि त्याबाबत असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे लसीकरण करणे टाळतात. लसीकरणाबाबत अजूनही जागरूकतेचा अभाव दिसून येतो. हे लक्षात असू द्या की, लसीकरण सुरक्षित आहेत आणि त्यांचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत.
लसीकरणानंतर, एखाद्या व्यक्तीला केवळ अंगदुखी, वेदना होणे आणि इंजेक्शन घेतलेल्या जागी काहीशी वेदना जाणवणे किंवा ताप येणे अशी लक्षणे जाणवू शकतात जी एक किंवा दोन दिवसांत कमी देखील होतात. याशिवाय, लसीकरणाशी संबंधित कोणतीही गंभीर गुंतागुंत नाही. या गैरसमजूतींचे निरसन करणे ही काळाची गरज आहे. असे डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमधील बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, ऍलर्जिस्ट आणि स्तनपान विशेष तज्ञ डॉ. बॉबी सदावर्ती यांनी सांगितलं. लसीकरण हे केवळ व्यक्तीचे संरक्षण करत नाहीत; तर त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या सर्वच व्यक्तींचे संरक्षण करतात, म्हणूनच, लसींशी संबंधित सर्व गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. असही ते म्हणतात.
काय आहेत सामान्य गैरसमजूती आणि वास्तविकता?
गैरसमज : लसीकरणाने संरक्षण न होता उलट ते आजार ते आजारास कारणीभूत ठरतात
वास्तविकता : रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिक पद्धतीने रोगापासून आपले संरक्षण करते. परंतु मुलांची रोगप्रतिकारक शक्ती तितकी विकसित नसते, त्यामुळे अनेक प्राणघातक आजारांपासून त्यांचे संरक्षण होत नाही. लसीकरणामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन ते अनेक आजारांपासून सुरक्षित राहतात.
गैरसमज : लसींमुळे ऑटिझम किंवा दीर्घकालीन दुष्परिणाम होतात
वास्तविकता : विविध अभ्यासांनी हा दावा केला आहे की लसीकरणामुळे ऑटिझम होत नाही. जर काही दुष्परिणाम असतील तर ते सौम्य आणि तात्पुरते असतात, जसे की ताप किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवा किंवा पोस्टवर विश्वास ठेवू नका; लसीकरण अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे. पालकांनी हे लक्षात ठेवा की, लसीकरणामुळे मुलाला ऑटिझम होणार नाही.
गैरसमज : प्रौढांसाठी लसीकरणाची आवश्यकता नाही
वास्तविकता : लसीकरण फक्त मुलांसाठी नाही तर प्रौढांसाठी देखील आहे. म्हणून, लक्षात ठेवा की प्रौढांना देखील फ्लू, शिंगल्स, न्यूमोनिया आणि टिटॅनस सारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























