एक्स्प्लोर

'नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून मी माघार घेतोय', महायुतीच्या वादात छगन भुजबळांची मोठी घोषणा

Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेबाबत जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल, तेवढ्या अडचणी वाढणार आहेत. मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे, असे मोठं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत अजून तिढा कायम आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी या जागेसाठी जोर लावलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हे देखील या जागेसाठी आग्रही होते. आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे. 

मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यात छगन भुजबळ म्हणाले की, देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीत जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या बाबत होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार (Ajit Pawar) यांचा निरोप आला होता. तिथे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे होते. आम्ही 6 वाजता दिल्लीवरून आलो आणि त्या ठिकाणी अमित शाह यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. तिथे जागा वाटपाबाबत चर्चा झाली.

तीन आठवडे झाले अजूनही उमेदवार जाहीर नाही

छगन भुजबळ यांना उभे करा, असे थेट अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं. त्यावेळी एकनाथ शिंदे  हे अमित शाह यांना म्हणाले की, तिथे हेमंत गोडसे (Hemant Godse) आमचे उमेदवार आहेत. परंतु अमित शाह म्हणाले की, आम्ही त्यांना समजावू. त्यानंतर आम्ही मतदारसंघात जाऊन आढावा घेतला. आम्हाला वातावरण चांगलं असल्याचं लक्षात आलं. अल्पसंख्याक ओबीसी आमच्या बाजूने असल्याचं लक्षात आले. त्यानंतर बातमी फुटली आणि माझ्या उमेदवारीबाबत माध्यमातून बातमी बाहेर आली. हे सूरू झाल्यानंतर मी बातमी खरी आहे का? हे चेक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केला ते म्हणाले की, अमित शाह यांनी तुम्हाला लढावं लागेल असे सांगितलं. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा तेच बोलले. त्यानंतर तीन आठवडे गेले. मात्र, अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही.

मी या निवडणुकीतून माघार घेतली - छगन भुजबळ 

महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील तीन आठवड्यापासून फिरत आहे. त्यांचा प्रचार देखील पुढं गेला आहे. जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या नाशिकच्या जागेवर महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी राज्यभरात प्रचाराला सुरूवात केली आहे. मी आता महायुतीची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला आत्तापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार आहे. मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीकाNarendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादनDelhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget