Chandrashekhar Bawankule : गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन; तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचे स्पष्टीकरण
Chandrashekhar Bawankule : गणेश नाईक यांच्या प्रमाणे शिवसेनेच्या सदस्यांनी देखील जनता दरबार घेतले पाहिजे. असे म्हणत गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule : ठाणे (Thane) जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने (BJP)केली आहे का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. अशातच राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बाबत भाष्य करत शिवसेनेच्या सदस्यांनी देखील जनता दरबार घेतले पाहिजे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटतील आणि जनतेचं भलं होईल, असे म्हणत गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एकप्रकारे समर्थन करण्यात आले आहे.
सर्व सदस्यांनी जनता दरबार घेण्यास मुभा- चंद्रशेखर बावनकुळे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी ही राज्यातील अनेक भागात जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही सदस्यांनी असे जनता दरबार घेतले पाहिजे. मुळात महायुतीतील सर्व सदस्यांनी अशा पद्धतीने जनता दरबार घेतल्यास त्याचा फायदा हा जनतेलाच होणार आहे. समजा शिवसेनेच्या अथवा राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यांनी एखाद्या जिल्ह्यात जाऊन चार आदेश पारित केले तर त्यातून जनतेचा भलं होणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना याबाबत उभा असून कुठलाही मंत्री हाय का जिल्ह्याचा नाहीतर राज्याचा मंत्री असतो. त्यामुळे तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊ शकतो. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला- शंभुराज देसाई
दरम्यान, याचं मुद्यावरून शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ही प्रतिक्रिया देत ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गणेश नाईक भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत. शिवाय नवी मुंबई ही ठाणे जिल्ह्यात आहे. मी देखील पालकमंत्री म्हणून ठाण्यात काम केले आहे. ठाण्याचे अनेक प्रश्न शिंदे साहेबांनी सोडवले आहेत. ज्याने त्याने आपल्या पक्षाचे काम करायला हवे, यात दुमत नाही. पण ठाणे जिल्हा हा आनंद दिघे साहेबांनी 25 ते 30 वर्षापासून आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी हा किल्ला भक्कम ठेवायचे काम केले आहे.
त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे राहील यात शंका नाही. तर राहिला प्रश्न महायुतीचा, भाजप देखील महायुतीचा भाग आहे. आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. शिंदे साहेब शिवसेना वाढवत आहेत तसेच मंत्री नाईक हेदेखील भाजप वाढवत आहेत. त्यामुळे त्यांचे आव्हान नाही, माध्यमांनी गैरसमज करू नये. महायुतीत आहोत त्यामुळे आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला आहे. असे ही शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
