Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं सडेतोड प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न असल्याची घणाघाती टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

Chandrashekhar Bawankule : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ( Harshvardhan Sakpal ) यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्यानं हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न असल्याची घणाघाती टीका करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chanrashekhar Bavankule) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय
औरंगजेबानं धर्माच्या नावावर हिंदूंचं शिरकाण केलं, मंदिरं पाडली, कर लादले. देवेंद्रजी मात्र सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवत आहेत. त्यांच्या काळात हिंदू धर्माला अभिमानानं उभं राहण्याची संधी मिळाली. औरंगजेबाची तुलना देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी करून काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत आहे. सपकाळ आणि काँग्रेसनं खालची पातळी गाठली आहे. त्यांच्या याच बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय आणि असे हास्यास्पद वक्तव्य करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती सपकाळ आणि काँग्रेसला जागा दाखवून देईल. असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कुणाचीही तुलना औरंगजेबाशी करणे योग्य नाही- विजय वडेट्टीवार
दरम्यान, याच मुद्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मतांशी फारकत घेतांना दिसले. मी हर्षवर्धन सपकाळ हे काय बोलले ऐकलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस असो कि आणखी कोणी असो, कोणाची अशी औरंगजेबाशी तुलना करणे योग्य नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे- एकनाथ शिंदे
औरंग्याची क्रूरता बघा, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी टीममध्ये होते. आता ते मुख्यमंत्री आहेत आमची टीम आहे. आम्ही जो काही कारभार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम केलं आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तोच आदर्श छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं होता, कोणाची तुलना करत आहात तुम्ही जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पटलवार केला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Harshawardhan Sapkal On Devendra Fadnavis: महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

