एक्स्प्लोर

Chandrakant Patil on Majha Maha Katta : रात्री दोनला अमित शाहांचा फोन, पहाटे चारला फडणवीसांची भेट, चंद्रकांतदादांनी सांगितली पहिल्या मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी

Chandrakant Patil on Majha Maha Katta : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझा महा कट्टा या कार्यक्रमात त्यांच्या पहिल्या मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी सांगितली आहे.

Chandrakant Patil on Majha Maha Katta : 2014 साली रात्री अमित शाह (Amit Shah) यांचा मला फोन आला. त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटण्यास सांगितले. पहाटे चार वाजता देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांनी सांगितले की, उद्या शपथ घ्यायची आहे, अशी पहिल्या मंत्रि‍पदाची इनसाईड स्टोरी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितली. 'एबीपी माझा महाकट्टा' (Majha Maha katta) या विशेष कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणात संबंधांपेक्षा माझ्यावरील विश्वास अधिक समर्पक शब्द वाटतो. तेरा वर्ष मी गुजरातमध्ये काम करत असताना 1982 मध्ये अमित शाह यांचे नुकतेच राजकारणात पदार्पण झालं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी असा आग्रह धरला होता की, विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडणारा हा जो कार्यकर्ता होता त्याला त्यावेळी एक पालक जोडला जातो. त्यावेळी मी अनेक वेगवेगळी काम केले. पण त्यातील एक मुख्य काम म्हणजे मी वेगवेगळ्या पालकांना जाऊन भेटायचो. अशावेळी अमित शहा यांच्याशी माझी नेहमी भेट व्हायची. यावेळी अमित शाह यांच्यासोबत माझं वेगळं नातं निर्माण होऊन आमच्यात एक विश्वास तयार झाला. त्यातही मला पदवीधरची पहिली सीट मिळाली.  त्यावेळी अमित भाई हे देखील गुजरातच्या राजकारणात होते.  

मोदीजींशी माझी नाळ अधिक जुळली

दरम्यानच्या काळात माझं मोदीजींसोबतही अशाच पद्धतीने संपर्क आला. 1970-75 च्या आणीबाणीच्या काळात त्यावेळी संघावर बंदी होती. विद्यार्थी परिषदेवर बंदी नव्हती. त्यामुळे त्यावेळी संघातील कार्यकर्त्यांना विद्यार्थी परिषदेचे काम करायला सांगितलं होतं. त्यावेळी 75 ते 77 आणि त्यापूर्वी गुजरातमध्ये मोठे आंदोलन झाले. त्या आंदोलनात विद्यार्थी परिषदेने लीड केलं. त्यावेळी प्रचारक असताना मोदींनी मला विद्यार्थी परिषदेचे काम करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे मी प्रत्यक्षात विद्यार्थी परिषदेचे फार काम करत नसतानाही मोदीजींशी माझी नाळ अधिक जुळली. 

पहाटे चार वाजता मी देवेंद्र फडणवीस यांची भेट

काळानुरूप आमच्यात दुरावा आला. मात्र आमच्यातील संपर्क, विश्वास हा कायम राहिला. दरम्यान 2014 मध्ये  मला रात्री अचानक अमित शाह यांचा फोन आला. रात्री दोन वाजता आमच्यात संभाषण झालं. त्यावेळी त्यांनी मला विचारलं तुम्ही काय करत आहात. त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलं की, मी आमदार निवासमध्ये आराम करत आहे. देवेंद्र फडणवीस नुकतेच निघाले असून ते दिल्लीहून तेथे पोहोचतील. त्यांनी मला सूचना केल्या की, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्या. त्यावेळी पहाटे चार वाजता मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेलो. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव असा आहे की ती सहज एखादी गोष्ट उघड करत नाहीत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आज शपथ घ्यायची आहे. मी उलट प्रश्न विचारला असता वरून आदेश आहे, असे उत्तर दिले. त्यावेळी असा हा एकंदरीत प्रकार घडला त्यामुळे काही प्रशासकीय अनुभव नसताना केवळ विश्वास आणि त्यांच्या नजरेत मी कायम असल्यामुळे मला ती संधी मिळाली आणि कदाचित मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो, असे त्यांनी म्हटले. 

...म्हणून चंद्रकांत पाटलांनी बोलणे कमी केले 

तुम्ही गेल्या काही काळात तुमचे बोलणे एकदम थांबवले आहे. याचे नेमके कारण काय? याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी काहीही बोललो तरी वाद होत होते. मी राज्याचा अध्यक्ष होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या श्रद्धेमुळे आमदारांच्या प्रतिक्रिया खूप आक्रमक होत्या. त्यांना समजावताना मी माझे परंपरंगत शब्द वापरणार ना. अरे बाबांनो हिंदुत्वाच्या रक्षणासाठी राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा. त्याचा अर्थ असा काढला गेला की मला एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री होणे आवडले नाही. मला एकनाथ शिंदे यांचे कौतुक वाटते की, त्यांनी लगेच केसरकर यांना बोलायला सांगितले. ते म्हणाले की, 105 आमदार, 7 अपक्ष असणाऱ्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले मग काय ते पेढे वाटणार का? त्यानंतर आणखी 4,5 प्रकरण घडले. त्यामुळे मी बोलणे कमी केले, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा

मी दोन मंदिरात जातो, शरद पवारांनी देवळांची नावं सांगितली, सुप्रिया म्हणाल्या माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Embed widget