संभाजीनगरच्या तिरंगी लढतीत चंद्रकांत खैरे आघाडीवर; पोलस्ट्राट एक्झिट पोलचा अंदाज
Chhatrapati Sambhaji Nagar Exit Poll : लोकसभा निवडणुकीबाबतचा 'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इससाईट्स'चा एक्झिट पोल समोर आलाय.
Chhatrapati Sambhaji Nagar Exit Poll : लोकसभा निवडणुकीबाबतचा 'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इससाईट्स'चा एक्झिट पोल समोर आलाय. महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढतीबाबतही अंदाज समोर आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकात खैरे आघाडीवर राहतील, असा अंदाज 'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इससाईट्स'चा एक्झिट पोलनुसार व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील पिछाडीवर पडताना दिसत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत
लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. दरम्यान या निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे जनतेला भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न चंद्रकांत खैरे यांनी केला होता. शिवाय, उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदाही उद्धव ठाकरेंना होणार असल्याची चर्चा आहे.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
छत्रपती संभाजीनगरमध्येही मराठा आरक्षणाचा फॅक्टर
बीड लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरमध्येही मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला पाहायला मिळाला होता. शिवाय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही मोठा प्रभाव या मतदारसंघात होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे चंद्रकांत खरैंना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यंदा मात्र, एमआयएमला दलित मतं मिळतील का? याबाबत अनिश्चितता आहे. कारण प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. चंद्रकांत खैरेंनी बॅरिस्टर अंतुलेंपासून काँग्रेसच्या अनेक मातब्बरांना धूळ चारत या चारही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता.
इतर महत्वाच्या बातम्या