एक्स्प्लोर

BMC Election 2026 MNS: मनसेचे उमेदवार ठरले; बंद लिफाफा घेऊन बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई शिवतीर्थवर पोहोचले, कोणाला संधी?

BMC Election MNS List: राज ठाकरे यांच्या मुंबई महानगरपालिकेकडून उमेदवारांची नाव निश्चित करण्यात आली आहेत. उद्यापासून या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत.

MNS Candidates list in Mumbai:  आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना व मनसेचे जागावाटप आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आपल्या उमेदवारांची नावे अंतिम केली आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेकडून शनिवारपासून आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. आज सकाळपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Camp) नेत्यांची बैठक सुरु होती. या बैठकीनंतर मनसेचे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे दोन्ही नेते एक बंद लिफाफा घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बंद खाकी लिफाफ्यात मनसे उमेदवारांची अंतिम यादी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आज रात्रीपासून संबंधित उमेदवारांना मनसेच्या कार्यालयातून उमेदवारीसंबंधीचे संदेश पाठवले जातील. त्यानंतर उद्या सकाळपासून सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले जाईल. दरम्यान, आता नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे दोघे राज ठाकरे यांची भेट घेतील. या बैठकीत मनसे उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जाईल.  

मनसेच्या मुंबईतील उमेदवारांची नावं आज निश्चित झाल्यानंतर त्यांना उद्यापासून पक्षाचा एबी फॉर्म दिले जातील. जेणेकरुन त्यांना प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करुन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी मिळेल. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मनसेकडून योग्य वेळेत आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. 

MNS Candidates list: मनसेचा पहिला उमेदवार ठरला

दादरमधील मुंबई महापालिकेतील वार्ड क्रमांक 192 हा युतीच्या अंतिम चर्चेमध्ये मनसेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर 192 वॉर्डमधून राज ठाकरेंच्या मनसेकडून मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) निवडणूक लढवणार सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंकडून पहिला उमेदवार (Shivsena UBT-MNS Yuti) ठरल्याची चर्चा आहे. 2017 च्या निवडणुकीत 192 या वॉर्डमधून ठाकरे गटाच्या प्रिती पाटणकर विजयी झाल्या होत्या. वॉर्ड क्रमांक 192 आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना दुपारी चार वाजता भेटणार आहेत. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला येणार आहेत.

BJP Shivsena seat sharing: भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाची घोषणा उद्या होण्याची शक्यता

भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाची घोषणा उद्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाणार आहे. याच संदर्भात आज रात्री शिवसेना समन्वय समितीतील नेत्यांची आज महत्वाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार आहे. आजच्या बैठकीत शिवसेनेच्या वाटयाला आलेल्या जागांवरील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. निश्चित उमेदवारांना उद्यापासूनच एबी फॉर्मचं वाटप केलं जाण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी रस्सीखेच असलेल्या जागांची उमेदवारी शेवटच्या क्षणी घोषित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी वाचा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणाला किती जागा, पहिल्या सर्व्हेचा अंदाज समोर, राज-उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget