एक्स्प्लोर

लोकसभेला फक्त 5 जागा दिल्या, विधानसभेलाही भाजप अजितदादा गटाची अवघ्या 20 जागांवर बोळवण करणार: रोहित पवार

Ajit Pawar Group MLA : आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना रोहित पवार यांनी महायुतीत अजित पवारांना मिळणाऱ्या जागांबाबतही भाष्य केलं आहे.

Rohit Pawar on NCP Ajit Pawar Group MLA : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आतापासूनच विधानसभेच्या जागावाटपाबाबात चर्चा सुरू झाल्या आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाराष्ट्रात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशी लढत दिसणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीनं दणदणीत यश संपादन केलं. महायुतीला मात्र, फारच कमी जागा मिळवता आल्या. लोकसभेत महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही, तेव्हापासून या ना त्या कारणाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील सहभागाचा मुद्दा ऐरणीवर येतोय. विरोधक तर टीका टिप्पणी करतायतच, पण सत्ताधाऱ्यांनीही अजित पवारांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच, अजित पवार गटाचे 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना रोहित पवार यांनी महायुतीत अजित पवारांना मिळणाऱ्या जागांबाबतही भाष्य केलं आहे. भाजप अजित पवार गटाला फक्त 20 जागा देईल, असं रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच, नाहीतर भाजप अजित पवारांना स्वतंत्र लढण्यास सांगेल, असंही रोहित पवार म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बातचित करताना रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महायुतीचा भाग असलेल्या अजित पवारांना महायुतीतील कार्यकर्ते आणि नेत्यांकडूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांना विरोध होताना पाहायला मिळतंय, पुण्यानंतर इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला. यासंदर्भात बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांच्या भविष्यातील वाटचालीबाबतही वक्तव्य केलं आहे. भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत. 

रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 

अजित पवारांना विरोध होताना पाहायला मिळतंय, पुण्यानंतर इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की, भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे. आता नेतेदेखील अजित पवारांबाबत खूप बोलतात. पण ते फारसं सकारात्मक नसतं. अशातच आता कार्यकर्त्यांनाही धाडसं आलं आहे अजित पवारांबाबत बोलायला. मग आता हे ठरलंय की, मुद्दाम केलं जातंय. अजित दादांना वेगळं करायचं. सर्व जागांवर अजित दादांना उभं करायचं. पाडण्यासाठी उभं करायचं. शरद पवारांचा पक्ष आहे, त्यांची मतं खाण्यासाठी उभं करायचं. पण आमदार एवढे खुळे नाहीत, त्यांनाही माहीत आहे, भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे. त्यामुळे एकतर अजित पवार भाजपसोबत राहिले, तर त्यांना 20 ते 22 जागा दिल्या जातील. आणि जर ते भाजपसोबत नाही राहिले तर मात्र सगळ्या जागांवर त्यांचे आमदार उभे राहतील, पण निवडून मात्र कोणीच येणार नाही."

दरम्यान, लोकसभेत महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही, तेव्हापासून या ना त्या कारणाने अजित पवारांच्या सरकारमधील सहभागाचा मुद्दा ऐरणीवर येतोय. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राने अजितदादांवर पराभवाचं खापर फोडलं. शिंदे गटाच्या रामदास कदमांनीही दादांवर तिरकस टिप्पणी केली. आणि आता तर भाजपच्या एका कार्यकर्त्यानं एकवेळ सत्ता नसली तरी चालेल, पण अजितदादांना सत्तेतून हाकला, असा पवित्रा घेतलाय.  

पाहा व्हिडीओ : Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात;10 जणांना पक्षात घेणार?

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अजितदादा गटाचे 22 आमदार संपर्कात, पण शरद पवार कोणाकोणाला परत घेणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Embed widget