एक्स्प्लोर

BMC Election 2026: भाजपने एकनाथ शिंदेंची 'त्या' 84 जागांची मागणी धुडकावून लावली; ठाकरेंशी थेट सामना झाल्यास पराभवाचा धोका, बैठकीत नेमकं काय घडलं?

Shivsena and BJP seat sharing in Mumbai: भाजप आणि शिवसेनेची जागावाटपाची बैठक काल पार पडली. या बैठकीत भाजपने 2017 साली शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा शिंदे गटाला देण्यास विरोध केला आहे.

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपासाठी गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने 2017 साली जिंकलेल्या 84 जागांवर आपला दावा सांगितला. मात्र, भाजपने (BJP) शिंदेसेनेची ही मागणी सपशेल धुडकावून लावली. भाजपने 2017 मध्ये शिवसेनेने (Shivsena) जिंकलेल्या 84 जागा यंदाही शिंदे गटाला सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत शिवसेनेने शिंदे गटाला मुंबईत फक्त 52 जागा देऊ केल्याची चर्चा होती. मात्र, कालच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर दोन्ही पक्षांनी ही बाब नाकारली होती. परंतु, जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येक जागेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे. जागावाटपच्या दुसऱ्या बैठकीनंतर शिवसेना-भाजपने 150 जागांवर एकमत झाल्याचे सांगितले असले तरी शिवसेनेला हव्या असलेल्या जागा भाजपकडून सोडल्या जाताना दिसत नाहीत.

शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या या जागा न सोडण्यासाठी भाजपने एक नवी थिअरी मांडली आहे. 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्यावतीनं निवडून आलेल्या 84 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आला होता. मात्र, या जागा सोडण्यास भाजपकडून स्पष्ट नकार दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी बहुतांश जागांवर शिंदे गटाचा सामना ठाकरे गटाशी होऊ शकतो. तसे घडल्यास शिंदे गटाच्या उमेदवारांच्या पराभवाची शक्यता अधिक आहे. शिंदे-ठाकरे थेट लढत झाल्यास महायुतीचे नुकसान होईल. त्यामुळे शिंदे गटाची पूर्ण ताकद असलेल्या जागाच शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. यावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु, भाजपने 2017 मध्ये जिंकलेल्या 82 प्रभागांपैकी मराठीबहुल जागांची शिंदे गटाशी अदलाबदल करुन याची भरपाई होऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 20 जणांचा समावेश आहे. या समितीमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासारख्या बड्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.

आणखी वाचा

'ठाण्यात शिंदे गटाशी युती नको' भाजप पदाधिकारी इरेला पेटले, थेट जिल्ह्याध्यक्षांना धाडलं पत्र; म्हणाले...

जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget