मिशन मुंबई, भाजप भाकरी फिरवणार; अध्यक्षपदासाठी बैठक, दोन आमदारांनी नावे समोर
मुंबईतील कार्यालयात होत असलेल्या या बैठकीत भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थितीत आहे.

मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने (BJP) नवी रणनीती आखायला सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने भाजप मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारीत असून मुंबई अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यास संधी दिली जाणार आहे. सध्या, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष आहेत. मात्र, मिशन महापालिका लक्षात घेऊन भाजपने मुंबईचं (Mumbai) नेतृत्व नव्या चेहऱ्याके देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये, आमदार प्रविण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत आहेत. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत आज बैठक सुरु असून भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष ही बैठकीत उपस्थित आहेत. प्रविण दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील कार्यालयात होत असलेल्या या बैठकीत भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थितीत आहे. भाजप मुंबई संघटनेत मोठे फेरबदल होणार असून, त्याचीच चर्चा आणि निर्णय या बैठकीत होणारा आहेत. मुंबई अध्यक्ष पदासाठी आमदार प्रवीण दरेकर आणि अमित साटम या दोघांची नावे चर्चेत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आणि निवडीला विशेष महत्व असणार आहे. भाजपने विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रात संघटन पर्व अभियान राबवत 1.5 कोटी सदस्य नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचं हे अभियान महत्वाचं पाऊल ठरणार आहे. तर, संघटनात्मक पातळीवर सध्या भाजपकडून मंडल अध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या निवडी होत आहे. त्यामुळे, आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपकडून संघटनात्मक बांधणी केली जात आहे. त्यातच, मुंबई महापालिका जिंकायचं मिशन भाजपचं आहे, त्यासाठी भाजपकडून मुंबईत विशेष लक्ष दिलं जात आहे.
दरम्यान, प्रवीण दरेकर हे भाजपचे आमदार असून ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेही राहिले होते. दरेकर हे भाजपचे राज्य सचिव आणि भाजपच्या सहकार विभागाचे प्रमुखही आहेत. ते सर्वप्रथम 2009 साली मुंबईच्या मागाठाणे मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2015 मध्ये त्यांनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला. तर, अमित साटम हेही भाजप आमदार असून त्यांनी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. साटम यांनी काँग्रेसच्या अशोक भाऊ यांचा 19,599 मतांनी पराभव केला आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते येथील मतदारसंघात आमदार आहेत.
हेही वाचा
हैदराबादमधील फाईव्ह स्टार हॉटेलला आग; काव्या मारनची SRH टीमचा होता मुक्काम, खेळाडू सुखरुप
























