BJP Candidate List: मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी-शाहांकडून कोणाला संधी?
BJP Loksabha Election Candidate list: भाजपने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल झाला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या बैठकीत 150 ते 200 उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आज अखेर भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भाजपच्या कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळाली?
वाराणसी - नरेंद्र मोदी
अंदमान निकोबार - विष्णू पडा रे
अरुणाचल पश्चिम - किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व - तपिर गावो
आसाम
सिलचर - परिमल शुक्ल वैद्य
गुवाहाटी - बिजुली कलिता
तेजपुर - रणजित दत्ता
नौगाव - सुरेश बोरा
दिबृगड - सर्वानंद सोनोवाल
छत्तीसगड
विलापसुर - तोखन साहू
राजनंदगाव - संतोष पांडे
रायपूर - ब्रिजमोहन अग्रवाल
बस्तर - महेश कश्यप
दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल
दिल्ली
चांदनी चौक - प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्वी दिल्ली - मनोज तिवारी
बांसुरी स्वराज
दक्षिण दिल्ली - रामविर सिंग बिधुडी
उत्तर गोवा
श्रीपाद नाईक
गांधीनगर - अमित शाह
राजकोट - पुरुषोत्तम रुपाला
पोरबंदर - मनसुख मांडवीय
नौसारी - सी. आर पाटील
जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग
कोडरमाल - अन्नपूर्णा देवी
हजारीबाग - मनीष जैस्वाल
केरळ
कासरगोड - एम एल अश्विनी
कन्नूर - प्रफुल्ल कृष्ण
कोझिकोडे - एम टी रमेश
त्रिशुर - सुरेश गोपी
अल्पुझा - शोभा सुरेंद्र
अटींगल - वी मुरलीधरन
गुना - ज्योतिरादित्य सिंधिया
भोपाल - देवल शर्मा
बिकानेर - अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय मंत्री)
अलवर - भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री)
भरतपूर-रामस्वरुप कोहली
जोधपूर - गजेंद्र सिंह शेखावत
चित्तोडगड - सी पी जोशी
कोटा- ओम बिर्ला
तेलंगणा
करीमनगर-बंडी संजयकुमार
निझामाबाद - अरविंद धर्मापूरी
त्रिपुरा - विप्लव कुमार देव
नैनिताल - अजय भट ( केंद्रीय मंत्री)
गौतम बुद्धनगर - डॉ महेश शर्मा
बुलंद शहर - भोला सिंह
मथुरा - हेमा मालिनी
एटा - राजू भैय्या
खिरी - अजय मिश्रा टेनी
उनाव - साक्षी महाराज
लखनऊ - राजनाथ सिंह
अमेठी - स्मृती इराणी
कनौज - सुब्रत पाठक
गोरखपूर - रवी किशन
पासगाव - कमेलश पासवान
जौनपुर - कृपा शंकर सिंह
कुंजबिहार - निशिथ प्रामाणिक
मुर्शिदाबाद - गौरी शंकर घोष
BJP announces first list of candidates for Lok Sabha elections; PM Modi to contest from Varanasi.
— ANI (@ANI) March 2, 2024
The first list of candidates includes 34 central ministers and MoS and Lok Sabha Speaker, says BJP National General Secretary Vinod Tawde. pic.twitter.com/05zQ1FUUCg