एक्स्प्लोर

राज्यासाठी एकनाथ शिंदे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री, पण आमच्यासाठी फडणवीसच 'लीडर' : गणेश नाईक

Ganesh Naik in Thane Mahayuti Melava : छोट्या चुका मोठया लोकांकडून कधी-कधी होत असतात, मात्र तुम्ही व्यवस्थित, काळजीपूर्वक  मतदान करा, असं आवाहन भाजप नेते गणेश नाईक यांनी केलं आहे.

ठाणे : राज्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री आहेत, मात्र आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) सर्वकाही आहेत, असं वक्तव्य भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंही कौतुक केलं आहे. ठाण्यात महायुतीच्या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गणेश नाईक यांनी भाषणात म्हटलं की, अभिजित पानसे यांना मागे टाकले, योग्य वेळी ते पुढे येणार. ठाणे जिल्हा 33 टक्के असा मतदार आहेत. छोट्या चुका मोठया लोकांकडून कधी-कधी होत असतात, मात्र तुम्ही व्यवस्थित, काळजीपूर्वक  मतदान करा. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, पण आमच्यासाठी फडणवीसच लीडर

राज्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, मात्र आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच सर्वकाही आहेत. एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आहेत, असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. मनसे शिस्त बद्द पक्ष आहे. डोलारा किती मोठा, त्यापेक्षा शिस्त बद्द पार्टी आहे. जल्लोष करण्यासाठी आपण पुन्हा भेटू, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

काय म्हणाले गणेश नाईक?

मला विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवू. आता माननीय मुख्यमंत्री आहेत, पण आमच्या दृष्टीकोनातून देवेंद्र फडणवीस हे आमचे लीडर आहेत. मी तर ओपन बोलतो, प्रोटोकॉल म्हणून एकनाथ शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, पण पक्षाच्या अनुषंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगानेच कारभार चालतो, असं नाईक यांनी म्हटलं आहे.

निरंजन सारखा तरुण तडफदार आपला उमेदवार : फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी संबोधित करताना म्हटलं की, निरंजन सारखा तरुण तडफदार आपला उमेदवार आहे. गेल्या 12 वर्षात त्यांनी खूप काम केलं, ज्याप्रमाणे ते आपला संपर्क ठेवतात ते महत्त्वाचे आहे. पदवीधरांची प्रश्न त्यांनी मांडले तर जनसामान्यांचे प्रश्न देखील त्यांनी मांडले, त्यामुळे सभागृहातील जागरूक सदस्य म्हणून त्यांना बघितलं जातं.

भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Padvidhar matadar sangh) माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी 'सशर्त' पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aditya Thackeray : ..तर निवडणूक आयोग एलॉन मस्क यांना अटक करेल; ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा जोरदार पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget