ज्यांनी कधी शाळेत मॉनिटरची निवडणूक लढवली नाही, ते काँग्रेस पक्ष चालवतात; गौरव वल्लभ यांना निशाणा कुणावर?
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस पक्ष हा आता माजी केंद्रीय मंत्र्यांचे पीए चालवत आहेत, त्यांना यूपी आणि बिहार हे दोन वेगळे पक्ष आहेत हेदेखील माहिती नाहीत अशी टीका गौरव वल्लभ यांनी केली आहे.
Gourav Vallabh on Jairam Ramesh : एकेकाळी काँग्रेसची मीडियावर आक्रमकपणे भूमिका मांडणारे गौरव वल्लभ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल करत त्यांची कार्यपद्धती कशी चुकीची आहे याचा पाढा वाचला. ज्या व्यक्तीने शाळेत असतानाही कधी मॉनिटरची निवडणूक लढवली नसेल तो व्यक्ती काँग्रेस पक्ष चालवतोय अशी टीका गौरव वल्लभ यांनी केली. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गौरव वल्लभ यांनी सुरुवातीला जयराम रमेश यांचे नाव घेतले नाही, नंतर मात्र त्यांच्यावर हल्लाबोल केला.
काँग्रेसचा जाहीरनामा एकच व्यक्ती तयार करतोय
गौरव वल्लभ हे जयराम रमेश यांच्यावर टीका करताना म्हणाले, "मी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा पक्षाचे 42 खासदार होते. नवीन विचारांना प्रोत्साहन मिळेल या विचाराने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र असे काहीही झाले नाही. गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेसचा जाहीरनामा एकच आहे. एक व्यक्ती तो तयार करत आहे, जर त्या व्यक्तीचे विचार ठाम असते तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती.
राम मंदिरामुळे पत्रकार परिषद घेण्यास नकार
गौरव वल्लभ म्हणाले की, "अर्थसंकल्पानंतर आपल्याला पत्रकार परिषद घेण्यास सांगितले होते. परंतु आपण तसे करण्यास नकार दिला आणि जोपर्यंत काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व अयोध्येतील राम मंदिराला भेट देत नाही, तोपर्यंत पत्रकार परिषद घेणार नसल्याचे सांगितलं."
माजी मंत्र्यांचे पीए पक्षाची धुरा सांभाळत आहेत
काँग्रेस पक्ष आता माजी केंद्रीय मंत्र्यांचे पीए सांभाळत असल्याची टीका गौरव वल्लभ यांनी केली. ते म्हणाले की, त्या पीएला निवडणूक कशी लढवायची हे माहित नाही. उत्तर प्रदेश आणि बिहार ही वेगवेगळी राज्ये आहेत हे त्यांना कदाचित माहीत नसेल. असे काही त्यांना विचारले तर ते गोंधळून जातील. जर तुम्ही त्यांना जालोरे, सरोही कुठे आहेत असे विचारले तर ते कदाचित मध्य प्रदेश म्हणतील. हे त्यांचे ज्ञान आहे. अशा नेत्यांचे ग्राउंड कनेक्शन खूपच कमकुवत आहे.
त्या व्यक्तीला आपली राज्यसभेची जागा वाचवण्यात रस
गौरव वल्लभ हे जयराम रमेश यांच्यावर टीका करताना म्हणाले की, “मी कॉलेजमध्ये असताना ती व्यक्ती काही वर्षांपूर्वी काँग्रेसची प्रवक्ता होती. आता ती संपर्क कक्षाची प्रमुख आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारसरणीत रस नाही. त्यांना फक्त त्यांची राज्यसभेची जागा राखण्यात रस आहे."
ही बातमी वाचा :