एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2024: भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार; अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसची अडचण, समीकरण काय?

Ashok Chavan Join BJP: भाजप राज्यसभेसाठी आपला चौथा उमेदवार देणार आहे. चौथ्या उमेदवारामुळे काँग्रेसची राज्यसभेची एक जागा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rajya Sabha Election 2024: नवी दिल्ली : भाजप (BJP) राज्यसभेसाठी (Rajya Sabha) आपला चौथा उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा भाजप प्रवेश आणि भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे काँग्रेसची (Maharashtra Congress) राज्यसभेची एक जागा अडचणीत येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अनिल बाबर (Anil Babar), गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचा मृत्यू आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा, तसेच, सुनील केदार (Sunil Kedar) यांची आमदारकी रद्द झाल्यानं सध्या काँग्रेसचं विधानसभेतील एकूण संख्याबळ 284 इतकं आहे. त्यामुळे एकूण आमदार भागीले एकूण उमेदवार अधिक एक यानुसार, 40 मतांचा कोटा होईल. त्यानुसार, भाजपला 3 जागा, शिवसेना (शिंदे गट) 1 जागा, राष्ट्रवादी (अजित दादा गट) 1 जागा आणि काँग्रेसला 1 जागा मिळताना दिसत आहे.  

काँग्रेसकडे सध्या 43 आमदार आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसचं समीकरण बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यसभेत भाजप आपला चौथा उमेदवार रिंगणात उतरवणार असल्यानं काँग्रेसचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

महायुती 6 जागांसाठी मतांचं गणित काय?  

  • या सहा जागांसाठी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहे. 
  • महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य आहेत, त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा या दोन आमदारांचं निधन झालं आहे, तर अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. 
  • त्यामुळे 284 आमदार उरतात भागिले रिक्त जागांची संख्या 6 + 1 = 40.57
  • राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 40.57 इतका मतांचा कोटा  असेल.
  • भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात.
  • एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 39 आमदार आणि 10 अपक्षांची मतं आहेत. त्यानुसार शिंदे गटाची एक जागा निवडून येऊ शकेल.
  • काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही.
  • पण अशोक चव्हाण भाजपमध्ये आमदार जास्त घेऊन आल्यास हे गणित मात्र बिघडू शकतं..

अशोक चव्हाण आणि राज्यसभेची चौथी जागा, भाजपची रणनिती काय? 

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांवर निवडणुका होणार आहेत. संख्याबळाच्या आधारे भाजप तीन, शिवसेना एकनाथ शिंदे 1, राष्ट्रवादी अजित पवार 1 राज्यसभेची जागा जिंकू शकतात. पण भाजपनं सहावी जागाही लढवण्याचा निर्णय घेतला, तर ती जिंकण्यासाठी क्रॉस व्होटिंग होऊ शकतं. अशा परिस्थितीत काँग्रेसचे समर्थक आमदार अशोक चव्हाण क्रॉस व्होटिंग करून भाजपची राज्यसभेची जागा जिंकून देऊ शकतात. दुसरीकडे, काँग्रेस माजी राज्यपाल रघुराम राजन यांना महाविकास आघाडी संयुक्त राज्यसभेचे उमेदवार म्हणून उभं करू शकते. 

अशोक चव्हाण भाजपसाठी कसे महत्त्वाचे ठरणार? 

2019 च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रात भाजपला सत्तेवरून बेदखल केलं आणि बहुमत मिळूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्या दोन वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन लोटसवर काम सुरू केलं. शिवसेनेचं पहिलं बंड एकनाथ शिंदे, नंतर अजित पवारांचं राष्ट्रवादी आणि त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधातील बंड. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता लोकसभा निवडणूक आली, तेव्हा काँग्रेसमध्येही फूट पडली. अशोक चव्हाण हेही आपल्या जवळचे अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, माजी आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार आहेत, अशा चर्चा सुरू आहेत. एक मोठा मराठा चेहराही भाजपमध्ये येणार असून विदर्भात पक्षाला बळ मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Politics: अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा 'हात' सोडला, भाजपची साथ देणार? महाराष्ट्राच्या राजकारणाची Inside Story

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget