कोरोना काळात कोटींची बिले केली चुकती, मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भ्रष्टाचार; काँग्रेसचा आरोप
Mira Bhayander Municipal Corporation: कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊन होतं, यातच शाळा कॉलेज खाजगी क्लासेस बंद होते.
Mira Bhayander Municipal Corporation: कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊन होतं, यातच शाळा कॉलेज खाजगी क्लासेस बंद होते. अशावेळी पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे संगणक क्लासेस, मेंहदी डिझाईन यासारखे कोर्स चालू होते. कारण तशी बिले ठेकेदाराला अदा केल्याचा गंभीर आरोप मिरा रोडच्या युवक कॉंग्रेसने केला आहे. यावर पालिकेने कोणताही भ्रष्टाचार झाला नसून, कोरोना काळात क्लासेस चालू असतील तर त्याबाबत माहिती घेऊ, चौकशी करणार असल्याच सांगितलं आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेत महिला व बालकल्याण विभागातून कोरोना काळात, ज्यावेळी कडक लॉकडाऊन लावलं गेलेलं, त्यावेळी महिला व बालकांना विविध योजनेतून प्रशिक्षण देऊन, कोटींची बिले घेतल्याचा गंभीर आरोप मिरा रोडच्या युवक कॉंग्रेसने केला आहे. पालिकेने कोरोना काळात संगणक क्लासेस, वेब डिझाईनिंग, मेहंदी डिझाईनिंग, इमिटेशन ज्वेलरी, टेलरिंग इत्यादी लघु उद्योग प्रक्षिशण केंद्र चालवलं होतं. त्यातील भाईंदरच्या घोडदेव नाक्याजवळील करीअर संगणक क्लासेस याला बालकांसाठी वेब डिझाईनिंग आणि त्यालाच मेंहदी डिझाईनिंग कोर्स दिला होता. ज्यावेळी संपूर्ण देशभर कडक लॉकडाऊन होतं. कडक निर्बंध होतं. शाळा कॉलेज, खाजगी क्लासेस बंद होते. त्यावेळी यांना कसे काय टेंडर देण्यात आले. यांच्याकडे मुले शिकत होती, यासंबंधित डाटा खोटा असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसने केला आहे. या ठेकेदाराला जवळपास कोटींची बिले पालिकेने अदा केल्याचा आरोप युवक कॉंग्रेसेचे पदाधिकारी दिप काकडे यांनी केला आहे.
याबाबत बोलताना दिप काकडे म्हणाले आहेत की, संगणक क्लासेस असलेल्याच सोसायटीत महिलांच्या समस्या व त्यावर होणारे अत्याचार यावर मार्गदर्शन करण्याकरीता महिला समुपदेशन केंद्र चालवण्याचा ठेका मे. महाशक्ती जनजागृती ट्रस्ट या संस्थेस दिला आहे. मात्र या संस्थेला केंद्र चालू करण्याचा काळ देश 24 जून २०२० ला दिला गेला. तर पालिकेच्या म्हणण्यानुसार 1 ऑक्टोंबर 2020 ते 30 मार्च 2021 या काळावधीत 2,44,998 ची रक्कम अदा ही केली गेली आहे. हे समुपदेशन केंद्र बंद असून, या संस्थेकडे किती महिलांनी याचा लाभ घेतला याचा डाटाच नसल्याचा आरोप युवक कॉंग्रेसने केला आहे.