एक्स्प्लोर

Bihar : बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास

Nitish Kumar Resignation : बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून आता भाजपचे नेते सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

पटना : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि बिहारच्या राजकारणातल एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोन नेत्यांभोवती बिहारचं राजकारण गेली चार दशकं फिरत होतं. आता लालू-नितीश पर्वाचा अस्त होत असून इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडे मुख्यमंत्रीपद येणार आहे. त्यामुळे बिहारचे राजकारण आता नव्या वळणावर आल्याचं चित्र आहे.

BJP CM Bihar : भाजपचा पहिला मुख्यमंत्री

इतिहासात पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असून विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांच्या निवडीची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली.

Nitish Kumar Exit : दोन दशकांची इनिंग संपली

2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या नितीश कुमारांची बिहारमधील राजकीय इनिंग आता संपुष्टात आली आहे. त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणे निश्चित झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हा राजीनामा देत औपचारिकता पूर्ण करण्यात आली.

Samrat Chaudhary Profile : राजकीय प्रवास

सम्राट चौधरी यांची राजकीय कारकीर्द लक्षवेधी आहे. ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. तारापूर मतदारसंघातून ते आमदार असून परबत्ता मतदारसंघातूनही दोन वेळा निवडून आले आहेत. ते दोन वेळा विधान परिषद सदस्य राहिले असून माजी मंत्री शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. त्यांनी राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

Political Shift Bihar : सत्तेतील मोठा बदल

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते विनोद तावडे यांनी पक्षाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं सांगितलं. दरम्यान, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या घडामोडींवर टीका केली आहे.

End of Lau Nitish Era : लालू-नितीश युगाचा अस्त

गेल्या 40 वर्षांपासून बिहारचे राजकारण लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या भोवती फिरत होते. दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीतून पुढे आले होते. आता या दोन्ही नेत्यांचे वर्चस्व संपत असून बिहारमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

BMC Mumbai: मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Embed widget