Baramati : अजितदादांच्या बूथ सदस्याकडून मतदारांना इशारा आणि दमदाटी; शरद पवार गटाची तक्रार, तर रोहित पवारांकडून थेट पैसे वाटपाचा व्हिडीओ शेअर
बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून मतदारांना दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात येतोय. तर रोहित पवारांनी एक व्हिडीओ शेअर करून अजित पवारांवर आरोप केलेत.
पुणे : राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आधी अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी दिलेल्या धमकीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता शरद पवार गटाकडून आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यात भिगवणमधील बूथ 5 मध्ये अजित पवारांच्या सदस्याकडून मतदारांना इशारा आणि दमदाटी सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतरही या गोष्टी सुरू असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये अजित पवार गटाकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला.
या संबंधित राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, 'विरोधकांकडून उपस्थित असणाऱ्या सनी भिमराव तापकीर नावाच्या व्यक्तीकडून मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना इशाऱ्याद्वारे दबाव आणून दमदाटी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नेमण्यात आलेला बूथ सदस्य प्रेम मनोज भोसले यांनी विरोधकांच्या या नियमबाह्य कृत्याची बाब वारंवार उपस्थित निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु उपस्थित यंत्रणांकडून कारवाईची कुठलीही ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून मतदानाच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सनी भिमराव तापकीर याच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून तातडीने कारवाई करण्यात यावी.'
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात भिगवणमधील बुथ ५ मध्ये विरोधकांकडून उपस्थित असणारा व्यक्ती ‘सनी भिमराव तापकीर’ याच्याकडून मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना इशाऱ्याव्दारे दबाव आणून दमदाटी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नेमण्यात… pic.twitter.com/8lyLXcnrtJ
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 7, 2024
रोहित पवारांकडून पैसे वाटपाचा व्हिडीओ शेअर
या आधीही बारामतीमध्ये पैसे वाटण्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार रोहित पवारांनी त्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. अजित पवारांच्या कारखान्यात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा नातलग पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका.. आणि इतर लोकं… pic.twitter.com/7zMNBxUGth
ही बातमी वाचा: