एक्स्प्लोर

Sunetra Pawar : बारामतीच्या पराभवानंतरही अखेर सुनेत्रा पवार खासदार! राज्यसभेवर बिनविरोध निवड

सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नाही. पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व सर्व पक्षातील नेत्यांचेआभार मानते, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

मुंबई बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election)  सुप्रिया सुळेंकडून (Supriya Sule)  पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP)  वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.  विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार या बिनविरोध  निवडून आल्या आहेत.  सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नाही. पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व सर्व पक्षातील नेत्यांचेआभार मानते, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने अजित पवार, कार्याध्यक्ष,कार्यकर्ते यांचे आभार मानते. दिलेल्या संधीचे सोनं करेल. लोकसभेच्या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली होती.  या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली आहे. माझ्यावर जो विश्वास पक्षाने दाखवला आहे. त्यांचे मी आभार मानते.

छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ पार्थ पवार, आनंद परांजपे बाबा सिद्दिकी इच्छुक होते. मात्र आता सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आलीय. छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. नाराजीविषयी सुनेत्रा पवारांना विचारले असता त्या म्हणाल्या, माझा उमेदवारीबाबत कोणतीही नाराजी दिसलेली नाही. भुजबळ देखील पक्षातर्फे फॉर्म भरताना उपस्थित होते. त्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.    

महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडले आहेत का?

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा अर्ज दाखल करताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि आमदार नरहरी झिरवळ उपस्थित होते. मात्र, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सत्ताधारी महायुतीमधील अन्य कोणताही नेता उपस्थित नसल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा :

Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी, नाराजीच्या चर्चांवर खुद्द भुजबळांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

                                 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
×
Embed widget