एक्स्प्लोर

Video: बच्चू कडू आक्रमक, वादाचा नेमका ट्रिगर पाँईट काय; अमित शाहांच्या सभेपूर्वीची A टू Z कहाणी

अमरावती येथील सायन्सकोर मैदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होत असून याच मैदानावर आमदार बच्चू कडू यांनीही सभेसाठी मैदान मिळावे म्हणून अर्ज केला होता

अमरावती - विदर्भातील हाय व्होल्टेज लढत मानलं जात असलेल्या अमरावती (Amravati) मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांना भाजपाने तिकीट दिल्याने येथील संघर्ष अधिकच चिघळला असून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी राणांविरुद्ध लोकसभेचा उमेदवार दिला आहे. तर, आनंदराज आंबेडकर हेही येथून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होत असून आमदार कडू मतदारसंघात राणा दाम्पत्यांविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची अमरावतीमधील सायन्सकोर मैदानात सभा होत असून या सभेची तयारी सुरू असतानाच आमदार बच्चू कडू थेट मैदानावर पोहोचले. यावेळी, पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.  

अमरावती येथील सायन्सकोर मैदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होत असून याच मैदानावर आमदार बच्चू कडू यांनीही सभेसाठी मैदान मिळावे म्हणून अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी बच्चू कडूंचा अर्ज अगोदर मंजूर केला होता. मात्र, अमित शाह यांच्या सभेमुळे पोलिसांनी त्यांच्या सभेसाठीची परवानगी नाकारली. त्यामुळे, बच्चू कडू आक्रमक होऊन सायन्सकोर मैदानावर कार्यकर्त्यांसह हजर झाले. यावेळी, पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता बच्चू कडू आक्रमक होत मैदानात शिरले. यावेळी, चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. 

पोलिसांनी नवनीत राणांच्या प्रचारासाठी येत असेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला मंजुरी दिली. त्यामुळे, बच्चू कडू आक्रमक झाले होते. गृहमंत्र्यांनी तुम्हाला नियम मोडायला सांगितले का, गृहमंत्र्यांच्या सभेला परवानगी कशी दिली, पोलिसांनी नियम का धाब्यावर बसवले? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पोलिसांना धारेवर धरले. तसेच, गृहमंत्रीच कायदा मोडून सभा घेत असतील तर आता काहीच उरले नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले. 

काय आहे नेमका वाद

आमदार बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी सायन्सकोर मैदान आरक्षित करण्यात आले होते. नवनीत राणा यांच्याकडे याच मैदानासाठी 21 व 22 एप्रिलपर्यंत परवानगी होती. तर, आम्हाला 23 व 24 तारखेची परवानगी मिळाली असतानाही आम्हाला मैदान न देता गृहमंत्र्यांच्या सभेसाठी हे मैदान दिल्याने आमदार कडू चांगलेच संतापले होते. 23 आणि 24 एप्रिलसाठी प्रहारने हे मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरुन पावती घेतल्याचा दावा प्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. मात्र, याच मैदानावर नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सभा बुधवारी 24 एप्रिल रोजी होत असून त्यासाठीची जय्यत तयारी सुरु असतानाच आज बच्चू कडूंनी मैदान गाठून पोलिसांना जाब विचारला. यावेळी, आमदार कडू चांगलेच आक्रमक झाले होते. 

बच्चू कडू पोलिसांवर संतापले

येथील सायन्सकोर मैदानावर कार्यकर्त्यांसह पोहोचलेल्या बच्चू कडूंनी आक्रमक बाणा दाखवत पोलिसांना सवाल केला. तसेच तुम्ही निपक्ष आणि सर्वांना समान न्याय देणार असल्याची शपथ घेता, त्या शपथेचा अपमान केला. आपण घेतलेल्या शपथेची आठवण ठेवा, असे म्हणत बच्चू कडूंनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे पाय धरुन गांधीगिरी करण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं. तर, आमची परवानगी असतानाही आम्हालाच मैदाना मिळत नसेल तर, सलाम तुमच्या वर्दीला अशी उपरोधात्मक टीकाही बच्चू कडूंनी केली. 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget