नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Bachchu Kadu on Nitesh Rane : आमदार बच्चू कडू यांचं वादळ सागर बंगल्यावर शमलय, असं भाजप नेते नितेश राणे म्हणाले होते.
Bachchu Kadu on Nitesh Rane : आमदार बच्चू कडू यांचं वादळ सागर बंगल्यावर शमलय, असं भाजप नेते नितेश राणे म्हणाले होते. राणेंच्या टीकेला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय. "खरतर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे. आम्ही शमणारे नाहीत. आम्ही सागरातील लाटा आहोत. ते राणेला माहिती नसेल. त्यामुळे राणेने याबाबत वाच्यता करु नये. मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही अमरावती पुरत लढत आहोत आणि मैत्रीपूर्ण लढत आहोत. तुम्हाला वाटत असेल आम्हाला छेडावं तर आमची काही हरकत नाही. सध्या महायुतीतून बाहेर पडण्याचा आमचा इरादा नाही", असं प्रत्युत्तर आमदार बच्चू कडू यांनी दिलय. ते अमरावती येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शाबासकी घ्यावी म्हणून मी इथ आलोय
बच्चू कडू म्हणाले, डॉ. हेगडे आणि मालपाणी अतिशय चांगल काम करत आहेत. मला वाटतय आम्ही करु शकलो नाही, तेवढं चांगल काम त्यांनी केलं. त्यांची शाबासकी घ्यावी म्हणून मी इथ आलोय. आम्ही आज नांदेड जिल्ह्याची बैठक घेतली आहे. चार जिल्ह्यातील लोक इथ आमंत्रित केले आहेत. काही ठराविक कार्यकर्ते बोलावले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीला आणि विधानसभा निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जायचे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
जे कष्ट करतात त्यांची अवस्था वाईट आहे
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, धर्म आणि जातीपेक्षा इथे लोकांचे मुद्दे महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे मजूरांचे प्रश्न आहेत. दिव्यांग बांधवांची , विधवा भगिनींचे प्रश्न महत्वाचे आहेत. जे कष्ट करतात त्यांची अवस्था वाईट आहे. मुकबधीर विद्यार्थ्यांनी सातवीनंतर शिकू नये, असं यांच धोरण आहे. महत्वाचे विषय घेऊन आपण लढलं पाहिजे. विषय हद्दपार होता कामा नयेत. वर्षा बंगल्यावर बोलला, सागर बंगल्यावर बोलला, हे महत्वाचे नाही, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
बच्चू कडू वीस वर्षांपासून अपक्ष लढतो
आमची स्वाभिमान आहे आम्ही डुबलो तरी चालेल स्वाभिमान जाता कामा नये. गुलामीत राहण्याची आमची सवय नाही,हम मर जाएंगे कर जायेंगे लेकिन ताकद से लढेंगे. बच्चू कडू वीस वर्षांपासून अपक्ष लढतो. ना झेंडा आहे ना नेता आहे. हमारा नेता मुंबई दिल्ली मे बैठने गाव मे बैठा है. मी शिंदे साहेबांचा आदर करतो, दिव्यांग मंत्रालयल आम्हाला दिलं. आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे भाजप शिंदे साहेबांना वाटलं तर बच्चू कडून युतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी कारवाई करावी, असही कडूही यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या