एक्स्प्लोर

Bachchu Kadu : आमचे 15-20 आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करु, उचलून नेऊन समुद्रात बुडवू : बच्चू कडू

Bachchu Kadu, Hingoli : "दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहात नाही. शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतोय. 15-20 आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करु, उचलून नेऊन टाकू समुद्रात, त्यासाठी तुमची साथ हवी आहे"

Bachchu Kadu, Hingoli : "दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहात नाही. शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतोय. 15-20 आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करु, उचलून नेऊन टाकू समुद्रात, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजेत", असे अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. ते हिंगोलीमध्ये बोलत होते. 

तुमच्या बापाचं राज्य आहे का? बच्चू कडू अजून जीवंत आहे

बच्चू कडू म्हणाले, आपली लढाई कष्ट करणाऱ्यांची आहे. एसटीमध्ये ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला 12 हजार महिना मिळतात आणि कलेक्टरच्या गाडीवर असलेल्या माणसाला 25 हजार रुपये महिना मिळतो. तू एका माणसाला घेऊन जातो तुला 45 हजार मिळतात. आमचा एसटी ड्रायव्हर 50 लोकांना घेऊन जातो, त्याला 12 हजार रुपये मिळतात. तुमच्या बापाचं राज्य आहे का? बच्चू कडू अजून जीवंत आहे. या लोकांना उखडून फेकून टाकू. तुमचं बाथरुम 5 लाखांचं आणि आमचं घर सव्वा लाखाचं, तुम्हाला लाज वाटत नाही का? हे कोणी विचारत नाही. घेतली कावड की निघाला. जातीच्या नावावर निवडून येणारे बरेच जण आहेत, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. 

तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडूंची 25 जागांसाठी चाचपणी

तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडूंनी 25 जागांसाठी चाचपणी केली आहे. सरकारकडे आमच्या 18 मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे, MIM सोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू अन्यथा आम्ही बसणार नाही. वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षाचं एक मत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढू. आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. 

अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू

सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू. आम्ही किमान 20 ते 25 जागांवर लढू जिथे जिथे चांगले उमेदवार मिळत आहेत तिथे आम्ही पुढे जाऊ. आमचा मूळ मुद्दा आहे शेतकऱ्यांचा त्या मुद्द्यावर जर सर्व एकत्र आले तर आम्ही नक्कीच सोबत राहू, अन्यथा नाही, असा इशाराही कडू यांनी दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Raj Thackeray : राज ठाकरे मुक्कामी असलेल्या धाराशिवच्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले, जोरदार घोषणाबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lord of the Rings च्या कोणत्या कलाकाराने Priyanka Chopra सोबत केलं काम?Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेतAmit Shah Special Report : भाजपचे चाणक्य शाहांचा मुंबई दौरा, महायुतींच्या नेत्यांच्या घेतल्या बैठकाTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
Embed widget