बात निकली तो दूर तक चलेगी; मी 2019 मध्ये जिथे होतो तिथेच, ज्यांनी भूमिका बदलली... : अमोल कोल्हे
Maharashtra Politics: मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांनी माझ्यासमोर आव्हान उभं केलं तर मी माझा गौरव मानतो. आमचे दादा नेते होते, त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणारं नाही, त्यासंदर्भात मी त्यांच्याशी बोलेन, असं अमोल कोल्हे म्हणाले.
Amol Kolhe PC After Sharad Pawar Meet: आदरणीय दादा मोठे नेते आहेत, आता ते जी टीका करत आहेत, मी आहे तिथेच आहे, मात्र जी काही टीका होत आहे, यासंदर्भात त्यांना कान धरण्याचा अधिकार होता, तेव्हाच त्यांनी धरला असता, तर सोपं झालं असतं, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले. तसेच, आढळराव यांच्याकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या टीकेसंदर्भात बोलताना, तुम्हाला एक म्हण माहीतच असेल, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी जोरदार टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे बोलताना म्हणाले की, "शेतकरी आक्रोश मोर्चा उद्यापासून सुरू होत आहे. 27, 28,29, 30 तारखेला शेतकरी मोर्चा आहे. शिवनेरीच्या पायथ्यापासून हा मोर्चा सुरू होईल, छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागू देऊ नका, अशी आज्ञापत्रात ताकीद दिली होती. त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे, यातले सहा प्रमुख मुद्दा घेऊन शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जात आहे. यातील सर्वात प्रमुख मागणी म्हणजे, कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी. तसेच, ठोस निर्यात धोरण निश्चित करावं."
"दुधाचा सर्वात मोठा प्रश्न असेल, दुधाचे दर गेल्या सहा ते आठ महिन्यांत दहा ते बारा रुपये प्रति लिटरप्रमाणे पडलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. सरसकट पाच रुपये अनुदान देण्यात यावं, ही एक मागणी आहे. यासंदर्भात मोर्चा काढला जाणार आहे.", असं अमोल कोल्हे म्हणाले. तसेच, "शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज देताना जाचक अटी मागे घेण्यात यावा यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. जुन्नरमधून हा दौरा सुरू होईल, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनं शरद पवारांची ठाम भूमिका आहे. 30 तारखेला शरद पवारांची विराट सभा पार पडणार आहे.", असं अमोल कोल्हे म्हणाले.
तेव्हाच त्यांनी कान धरला असता, तर सोपं झालं असतं : अमोल कोल्हे
"आदरणीय दादा मोठे नेते आहेत, आता ते जी टीका करत आहेत, मी आहे तिथेच आहे, मात्र जी काही टीका होत आहे, यासंदर्भात त्यांना कान धरण्याचा अधिकार होता, तेव्हाच त्यांनी धरला असता, तर सोपं झालं असतं." असं अमोल कोल्हे म्हणाले. माझ्या मतदारसंघाची त्यांनी (अजित पवारांनी) पाहणी केली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांनी माझ्यासमोर आव्हान उभं केलं तर मी माझा गौरव मानतो. आमचे दादा नेते होते, त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणारं नाही, त्यासंदर्भात मी त्यांच्याशी बोलेन, असं अमोल कोल्हे म्हणाले. शिवाजीरान आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) तुमच्यावर टीका करत आहेत, यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, तुम्हाला एक म्हण माहीतच असेल, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, ही म्हण अढळराव पाटलांना लागू पडते (अढळरावांचं नाव घेतलं नाही).
मी 2019 साली जिथे होतो, तिथेच आहे, ज्यांनी भूमिका बदलली त्यांनाच विचारा : अमोल कोल्हे
"मी 2019 साली शिरूरमधून निवडून आलो त्यात राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांची मोठी मदत आहे. मी 2019 साली जिथे होतो, तिथेच आहे. ज्यांनी भूमिका बदलली त्यांना विचारा, खासगीत जी चर्चा असते त्याची वाच्यता सार्वजनिक करू नये. माझी ज्येष्ठ नेत्यांसोबत जी चर्चा झाली ती खासगीत झाली होती, त्यांनी ती काही प्रमाणात सार्वजनिक केली असली तरी मी बोलणार नाही. पवार साहेबांनी याधीच स्पष्ट केलं की शिरूर मतदारसंघात जनेतनं संधी दिल्यास मी काम करेन, आताच्या राजकारणाचा एकूणच पोत बघितला तर समाजकारणात तरूणाईचा विश्वास कायम राहावा, सुंस्कृतपणा जपला जावा यासाठी काम करण्याचं काम आमच्यासारख्या नेत्यांचं आहे.", असं अमोल कोल्हे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मी जे सांगितलं ते फायनल; काल आव्हान दिलं अन् आज सकाळीच अजित पवार थेट अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात