Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
Delhi New CM Atishi: मंत्री आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री (Chief Minister) होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. मात्र, आपच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांच्या नावाचा निर्णय कसा झाला? जाणून घ्या सविस्तर
दिल्ली: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घोषित केला आहे. त्यामुळे, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती. अरविंद केजरीवाल यांनी पक्षातील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी (Atishi) यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे. मंत्री आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री (Chief Minister) होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. मात्र, आपच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांच्या नावाचा निर्णय कसा झाला? आतिशींच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं याबाबती इनसाईट स्टोरी जाणून घ्या सविस्तर.
आतिशी (Atishi) यांची आम आदमी पार्टी (AAP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्या आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. आतिशी आज (17 सप्टेंबर) संध्याकाळी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांची भेट घेतील त्यानंतर त्या सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी मंत्री आतिशी (Atishi) यांना त्यांच्या जागी पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव ठेवला, जो आप आमदारांनी एकमताने स्वीकारला. ही बैठक जवळपास 20 ते 25 मिनिटे चालली. या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी केजरीवाल यांनी सांगितलेल्या नावाला सहमती दर्शवली आहे.
आमदाराने एबीपी न्यूजला सांगितली आतील गोष्ट
दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील आपचे आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, सर्व आमदार बसले आणि सर्वांशी चर्चा सुरू झाली.अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यावर विश्वास आहे, पुढचा मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार अरविंद केजरीवाल यांना आहे, असा ठराव सर्व आमदारांनी एकमताने मांडला आणि आम्ही मरेपर्यंत तुमच्यासोबत एकत्रित उभे राहू असे सांगितले. तुम्ही (अरविंद केजरीवाल) जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी याबाबचा प्रस्ताव मांडला.
सोमनाथ भारती काय म्हणाले?
मालवीय नगरमधील आपचे आमदार सोमनाथ भारती यांनीही असाच दावा केला आहे. त्यांनी एबीपी न्यूजला सांगितले, "अरविंद केजरीवाल यांच्या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शवली."
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आप नेते गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुढील निवडणुकीपर्यंत आतिशी (Atishi) यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे.
आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. जेव्हा लोक त्यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतील तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू, असे ते म्हणाले होते. केजरीवाल आज संध्याकाळी नायब राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देणार आहेत. आतिशी (Atishi) 'आप'चा प्रमुख चेहरा आहेत. त्यांच्याकडे वित्त, शिक्षण आणि PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांसह अनेक विभागांचा कार्यभार आहे.