Ashok Chavan Live : आता व्यक्तिगत टीका करणार नाही, वेळ आल्यावर बोलेन - अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
LIVE
Background
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. आज त्यांचा अधिकृत भाजपमध्ये प्रवेश झाला.
चव्हाणांच्या जाण्याने केवळ जालन्यात फरक पडेल
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने आम्हाला कोणताही फरक पडणार नाही...काँग्रेस तसा मोठा सागर आहे, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही असं विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हंटले आहे...एक जण गेला तर दुसरा येईल असंही ते म्हणाले सोबतच राज्यसभेच्या जागेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, एका सदस्यावर राज्यसभा अवलंबून नसते, मोठा ग्रुप असता तर फरक पडला असता...अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने जालन्यात थोडाफार फटका बसू शकतो, उर्वरीत मराठवाड्यात कोणताही फरक पडणार नाही असंही दानवे म्हणाले.
Ashok Chavan BJP : अनेक नेते आमच्या संपर्कात- देवेंद्र फडणवीस
आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. जे नेते योग्य वाटतात त्यांच्याशी आमची चर्चा आहे. हे खरं आहे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा रोल काय असेल याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Ashok Chavan BJP : काँग्रेसला पक्ष सांभाळता येत नाही - देवेंद्र फडणवीस
Ashok Chavan BJP : काँग्रेसला त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली हे कळत नाही. देशातील मुख्य धारेत जायला पाहिजे असे मुख्य नेत्याना वाटते म्हणून नेते आमच्याकडे येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टीका करणे योग्य नाही - अशोक चव्हाण
काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटले. मी पक्षासाठी योगदान दिले. मी पार्टी वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे टीका करणे योग्य नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
आता व्यक्तिगत टीका करणार नाही, वेळ आल्यावर बोलेन - अशोक चव्हाण
आम्ही विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. विकासाची आम्ही नेहमी साथ दिली. 38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय.
विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करून. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांना दिलेली. पंतप्रधान मोदी सबका साथ सबका विकास करत आहेत. मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही.
सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिकपणे केले. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी संबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही.